Accident: हेच खरे देवदूत! दुचाकी अपघातात दोघे जण गंभीर जखमी, वायुवेग पथकाने वाचवले प्राण

Last Updated:

Accident: यामध्ये दोघे जण गंभीर जखमी होते. मात्र दोघांना गोल्डन अवरमध्ये दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

News18
News18
पुणे- सातारा महामार्गावर खेड शिवापूर परिसरात सोमवारी रात्री अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. यावेळी या परिसरात कर्तव्यावर असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) वायुवेग पथक तीनच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने जखमींना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी होते. मात्र दोघांना गोल्डन अवरमध्ये दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंदेवाडीजवळ सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वार घसरून अपघात झाला. हा अपघात भीषण झाल्यामुळे दोघांना गंभीर जखम झाली होती. यावेळी वेळी महामार्गावर तपासणीसाठी तैनात असलेल्या वायुवेग पथकाने अपघात पाहताच त्वरित मदतीसाठी धाव घेतली.
advertisement
मोटार वाहन निरीक्षक समीर शिरोडकर, सहायक निरीक्षक श्रुती नरखेडकर आणि चालक महादेव महाले यांनी अपघातस्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. यावेळी त्यांना घटनास्थळी एक पुरुष आणि दोन अन्य व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. तत्काळ सरकारी वाहनाच्या साह्याने तिघांनाही राजगड येथील श्लोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून, एका पुरुषाला मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे.
advertisement
वायुवेग पथकाने अपघाताची माहिती देण्यासाठी तत्काळ 112 आपत्कालीन क्रमांकावर फोन करून राजगड पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अपघाताची अधिकृत नोंद राजगड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी वेळीच पोहोचून जखमींना गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात दाखल केल्यामुळे दोघांचे जीव वाचले. वायुवेग पथकाच्या या तत्पर आणि सहृदय मदतकार्याचे स्थानिक नागरिक आणि रुग्णालय प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Accident: हेच खरे देवदूत! दुचाकी अपघातात दोघे जण गंभीर जखमी, वायुवेग पथकाने वाचवले प्राण
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement