advertisement

September festivals: सप्टेंबर महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल; श्रावण संपताच गणेश चतुर्थी आणि..

Last Updated:

September festivals: 3 सप्टेंबरला संकष्टी चतुर्थी व्रतापासून सप्टेंबर महिन्यातील व्रत-उपवास सुरू होऊन 29 सप्टेंबरला प्रोष्ठपदी पौर्णिमेपर्यंत विविध सण साजरे केले जातील.

गणेश चतुर्थी कधी आहे
गणेश चतुर्थी कधी आहे
मुंबई, 30 ऑगस्ट : सप्टेंबर हा इंग्रजी कॅलेंडरचा 9 वा महिना आणि हिंदू कॅलेंडरचा 6 वा महिना सुरू होत आहे. सप्टेंबर महिन्यात श्रावण संपून भाद्रपद महिना सुरू होईल. हिंदू कॅलेंडर 2023 मध्ये भाद्रपद महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात.
यंदा सप्टेंबर महिन्यात एकूण 15 महत्त्वाचे हिंदू उपवास आणि सण साजरे केले जाणार आहेत. ज्योतिषी पंडित अमरनाथ द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार उर्वरित श्रावण आणि भाद्रपद महिना व्रत-उपवास आणि सणांनी भरलेला आहे. 3 सप्टेंबरला संकष्टी चतुर्थी व्रतापासून सप्टेंबर महिन्यातील व्रत-उपवास सुरू होऊन 29 सप्टेंबरला प्रोष्ठपदी पौर्णिमेपर्यंत विविध सण साजरे केले जातील.
advertisement
सप्टेंबरमध्ये येणाऱ्या सण-उत्सवांची यादी -
03/सप्टेंबर: रविवार > संकष्टी चतुर्थी
06/सप्टेंबर: बुधवार > कृष्ण जन्माष्टमी
07/सप्टेंबर: गुरुवार > गोपाळकाला (जन्माष्टमी वैष्णव पंथ)
10/सप्टेंबर: रविवार > कृष्ण पक्ष अजा एकादशी
12/सप्टेंबर: मंगळवार > कृष्ण पक्ष भौमप्रदोष व्रत
13/सप्टेंबर: बुधवार > मासिक शिवरात्री
advertisement
14/सप्टेंबर: गुरुवार > दर्श पिठोरी अमावस्या
17/सप्टेंबर: रविवार > विश्वकर्मा पूजा, कन्या संक्राती
18/सप्टेंबर: सोमवार > हरतालिका पूजा
19/सप्टेंबर: मंगळवार > गणेश चतुर्थी (गणेश उत्सवाची सुरुवात)
23/सप्टेंबर: शनिवार > ज्येष्ठा गौरी-घरगुती गणपती विसर्जन
25/सप्टेंबर: सोमवार > शुक्ल पक्ष एकादशी (परिवर्तिनी स्मार्त एकादशी)
advertisement
27/सप्टेंबर: बुधवार > शुक्ल पक्ष बुधप्रदोष व्रत
28/सप्टेंबर: गुरुवार > अनंत चतुर्दशी
29/सप्टेंबर: शुक्रवार > प्रोष्ठपदी पौर्णिमा (पितृपक्ष सुरुवात)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
September festivals: सप्टेंबर महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल; श्रावण संपताच गणेश चतुर्थी आणि..
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement