advertisement

मोठी बातमी! चंद्रग्रहणामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शन वेळेत मोठा बदल, मंदिर प्रशासनाने दिली महत्वाची अपडेट

Last Updated:

मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दर्शन आणि पूजेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत.

News18
News18
Mumbai : मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दर्शन आणि पूजेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. ग्रहणामुळे पाळल्या जाणाऱ्या वेधांमुळे भाविकांच्या दर्शनावर आणि धार्मिक विधींवर काही मर्यादा येणार आहेत. नियमात आणि वेळापत्रकात नेमके काय बदल करण्यात आले आहेत जाणून घेऊ.
चंद्रग्रहणाची स्थिती आणि वेळ
फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच 3 मार्च रोजी हे खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे धार्मिक नियम आणि वेध पाळले जाणार आहेत. ग्रहणाची वेळ दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी सुरू होईल, तर समाप्ती सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी होईल. सूर्योदयापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळले जातील.
advertisement
सिद्धिविनायक मंदिर दर्शन वेळापत्रकात झालेले बदल
चंद्रग्रहणाच्या काळात मंदिराच्या पवित्रतेचे आणि शास्त्राचे जतन करण्यासाठी मंदिर न्यासाने काही बदल केले आहेत. नेमके काय बदल केले आहेत आणि दर्शन कस घेता येणार जाणून घेऊ.
गाभारा दर्शन आणि पूजा
ग्रहणाचा स्पर्श दुपारी 3:20 ला होत असला, तरी तयारीसाठी दुपारी 3 ते सायंकाळी 7:30 या वेळेत गाभाऱ्यातील दर्शन पूर्णपणे बंद राहील. मात्र, या काळात मुखदर्शन किंवा बाहेरील दर्शन सुरू राहणार आहे, जेणेकरून भाविकांना लांबून बाप्पाचे दर्शन घेता येईल.
advertisement
आरती आणि नैवेद्य
पहाटेच्या काकड आरती आणि पूजेच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, दुपारी वेध काळ असल्याने दुपारी नैवेद्य दाखवला जाणार नाही. ग्रहण मोक्ष झाल्यानंतर शुद्धीकरण करून रात्री 9:30 वाजता महानेवेद्य आणि आरती पार पडणार आहे.
प्रसाद आणि इतर निर्बंध
दुपारी 3 ते 7:30 या कालावधीत मंदिरात कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारला जाणार नाही किंवा वाटला जाणार नाही. भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन न्यासाने केले आहे.
advertisement
ग्रहणाचे धार्मिक महत्त्व आणि मंदिर मर्यादा
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहण काळात मंदिरे बंद ठेवण्याची किंवा देवाच्या मूर्तीला स्पर्श न करण्याची प्रथा आहे. याचे कारण असे मानले जाते की, ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने या शास्त्राचा आधार घेत भक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणि धार्मिक पावित्र्यासाठी हे बदल केले आहेत. सायंकाळी 7:30 वाजता धूपारती झाल्यानंतर मंदिर परिसर शुद्ध करून पुन्हा नेहमीप्रमाणे भक्तांसाठी गाभारा उघडला जाईल.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
मोठी बातमी! चंद्रग्रहणामुळे सिद्धिविनायकाच्या दर्शन वेळेत मोठा बदल, मंदिर प्रशासनाने दिली महत्वाची अपडेट
Next Article
advertisement
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement