उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य, पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत 1100 नारळांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
पुणे, 16 नोव्हेंबर : गाणपत्य संप्रदायात कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. अंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन घडते, त्यांना म्हणतात उमांगमलज. त्यामुळेच दगडूशेठ गणपती मंदिरात हा जन्मोत्सव सोहळा साजरा करीत 1100 नारळांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
पुणेकरांची गर्दी
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास आणि धार्मिक विधी यानिमित्ताने मंदिरामध्ये पार पडले. दगडूशेठ गणपतीची ही सजावट पाहण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासून गर्दी केली आहे.
तब्बल 30 बाय 40 फुट जागेत प्रतापगडाची प्रतिकृती, Video पाहून चिमुकल्यांचं कराल कौतुक
मनाचे प्रतीक आहे फुल. तर बुद्धीचे प्रतीक आहे नारळ. नारळाला जशा बुच्या असतात, त्यात करवंटी असते, त्यावर तीन डोळे असतात, तशीच रचना आपल्या डोक्याची आहे. त्या डोक्याचे, त्यात असणा-या बुद्धीचे प्रतीक आहे नारळ. भगवंताला मन आणि बुद्धी समर्पित करण्याचे प्रतीक फुल आणि नारळ. बुद्धीवरील मळ झटकून त्या शुद्ध बुद्धीला श्री गजानन चरणी नतमस्तक करण्याचा हा उत्सव असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी सांगितले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 16, 2023 7:12 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य, पाहा Video