तब्बल 30 बाय 40 फुट जागेत प्रतापगडाची प्रतिकृती, Video पाहून चिमुकल्यांचं कराल कौतुक

Last Updated:

कोल्हापुरातील एका तरुण मंडळाच्या बालचमुंनी तब्बल 30 बाय 40 फुट जागेत मोठाच्या मोठा किल्ला बनवला आहे.

+
News18

News18

कोल्हापूर, 16 नोव्हेंबर : दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांना फटाक्यांबरोबर आवडणारी अजून एक गोष्ट म्हणजे किल्ले बनवणे. सध्या शहरीकरणामुळे बाजारपेठांमध्ये तयार प्लास्टरचे किल्ले विक्रीला आलेले पाहायला मिळतात. वेगवेगळ्या आकारांचे आणि वेगवेगळ्या किंमतीचे हे किल्ले बरेच लहान मुले विकत घेतात. पण मातीत खेळत दगड मातीचा एक छोटा किल्ला बनवणे ही गोष्ट देखील बऱ्याच जणांना अनुभवायला मिळते. अशाच पद्धतीने कोल्हापुरातील एका तरुण मंडळाच्या बालचमुंनी तब्बल 30 बाय 40 फुट जागेत मोठाच्या मोठा किल्ला बनवला आहे.
कोल्हापुरातील रंकाळा तलावानजिक असणाऱ्या श्री राजे संभाजी तरुण मंडळातील काही लहान मुलांनी प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती यावर्षी साकारली आहे. खरंतर या मंडकळा मार्फत गेली वीस वर्षे विविध किल्ले आणि दुर्ग यांच्या प्रतिकृती दरवर्षी बनवल्या जातात. आपली ऐतिहासिक परंपरा जपत लहान मुलांना इतिहासाची शिकवण देणे हाच त्या मागचा हेतू असतो, असे मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विकास जाधव यांनी सांगितले.
advertisement
यावर्षी बनवला प्रतापगड
यंदा मंडळाच्या सर्व मुलांनी प्रतापगड हा किल्ला बनवण्याचे ठरवले होते. कारण अफजलखान वधामुळे जरी हा किल्ला सर्वांना ठाऊक असला तरी किल्ल्याबाबतची सर्व माहिती आम्ही या किल्ल्याच्या प्रतिकृतीतून सांगू इच्छितो. हा किल्ला 30 फुट बाय 40 फुट इतक्या मोठ्या परिसरात बनवलेला आहे. किल्ला बनवण्यासाठी जवळपास दीड ते दोन महिने पूर्वतयारी केली होती. आम्ही सर्वप्रथम हा किल्ला सहल काढून स्वखर्चाने प्रत्यक्ष जाऊन पाहिला. त्या ठिकाणी गाईडकडून तसेच इतर पुस्तके, छायाचित्रे यांच्या माध्यमातून माहिती मिळवली. गुगलवरुन एक फोटो घेऊन किल्ल्याचा आराखडा बनवला. वेळप्रसंगी किल्ल्याचे छोटे-छोटे भाग बनवून नंतर एकत्र केले. या सगळ्या आम्ही 20 ते 25 जण राबत होतो, असे किल्ला बनवणाऱ्या विश्वजित जाधव या मुलाने सांगितले.
advertisement
किल्ल्याची ठळक वैशिष्ट्ये, प्रतापगडाच्या पायथ्याला घडलेला अफजलखान वधाचा प्रसंग, गडावरील वातावरण, ऐतिहासिक वास्तू आणि त्यांचे महत्व आदी घटकांचा पद्धतशीर अभ्यास करूनच उभारणी केलेली आहे. तसेच कोणतेही कृत्रिम घटक न वापरता फक्त दगड, माती आणि रंग यांचा वापर आम्ही किल्ला बनवण्यासाठी केला आहे. त्यामुळेच हा किल्ला पाहताना प्रत्यक्ष किल्ल्यावर असल्याचा भास तयार होतो, असे सिद्धेश चौगले याने सांगितले.
advertisement
म्हशींना सजवून रस्त्यावर का पळवतात कोल्हापूरकर? काय आहे नेमकं कारण
दरवर्षी किल्ला पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. अशाच प्रकारचे किल्ले बनवत आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये बक्षीसे, पारितोषिके मिळवलेली आहेत. तर इतिहास अभ्यासक, संशोधक, शाहीर असे विविध मान्यवर देखील या ठिकाणी किल्ले पाहण्यासाठी आवर्जून येत असतात, असेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
तब्बल 30 बाय 40 फुट जागेत प्रतापगडाची प्रतिकृती, Video पाहून चिमुकल्यांचं कराल कौतुक
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement