advertisement

जेवायचं आणि झोपायचं! BBM 6 मध्ये राखीचा ड्रामा सुरू, राकेश-सागरसोबत केलं असं काही की... VIDEO

Last Updated:

Rakhi Sawant : राखी सावंतने Bigg Boss Marathi 6 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे. राखीने पहिल्याच दिवशी घरातील सगळ्या सदस्यांना सळो की पळो करून सोडलं आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये आता खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंटचा तडका लागला आहे. घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची धडाकेबाज एन्ट्री झाली आहे. राखी घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून गेली आहे. तिने घरात एन्ट्री घेताच घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. घरात जाताच तिनं तन्वी कोलतेची शाळा घेतली. पहिल्याच दिवशी राखीचा ड्रामा सुरू झाला आहे. बिग बॉसच्या आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे.
राखी सावंतचा स्वभाव जितका बिनधास्त, तितकाच तिचा खेळ बेधडक असतो. ती कोणाचाही विचार न करता स्वतःच्या अटींवर खेळते. वेळ आली तर ती संपूर्ण घराची दिशा बदलण्याची ताकद ठेवते. त्यामुळेच बिग बॉसच्या घरात राखीची एन्ट्री म्हणजे ड्रामाचं लेव्हल अप मानली जात आहे. तिच्या खेळानुसार तिनं पहिल्याच दिवशी घरातील सगळ्या सदस्यांना सळो की पळो करून सोडलं आहे.
advertisement
घरात गेल्यानंतर पहिल्याच दिवशी राखीने तिचा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये सागर राखीला ड्युटीबाबत विचारताना दिसतो. सागर तिला विचारतो, "मला तू सांगितलं नाहीस की ड्युटी कोणती करणार आहेस?" त्यावर राखी उत्तर देते, "मी दोन ड्युटी करणार, जेवायची आणि झोपायची."
advertisement
हे ऐकून घरातील सदस्यही अवाक होतात. अनुश्री तिला म्हणते, "तू माझ्यासोबत जेवण बनव". मात्र राखी तिला थेट सुनावते, "तुम्ही मला शिकवू नका." राखीचा ड्रामा इथेच थांबत नाही. ती घरात जाते आणि सगळ्यांना म्हणते, "आता मी सती सावित्री आहे. उद्यापासून गांधारी होणार. सगळ्यांना उडवून बाहेर काढेन."
advertisement
प्रोमोच्या शेवटी एक धक्कादायक सीनही दिसतोय. राखी सावंत राकेश बापट आणि सागर कारंडेला स्विमिंग पूलमध्ये ढकलताना दिसतेय. हा बिग बॉसचा टास्क होता की राखीची स्वतःची खेळी हे आजच्या भागातच समजणार आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरात गेलेली राखी कोणाशी मैत्री करेल, कोणाशी वाद घालेल, कोणाच्या भावना जिंकेल आणि कोणाच्या नसा दाबेल हे आधी सांगणं कठीण असतं. पण तिचा गेम पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
जेवायचं आणि झोपायचं! BBM 6 मध्ये राखीचा ड्रामा सुरू, राकेश-सागरसोबत केलं असं काही की... VIDEO
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement