म्हशींना सजवून रस्त्यावर का पळवतात कोल्हापूरकर? काय आहे नेमकं कारण

Last Updated:
दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरात म्हशींच्या सौंदर्य स्पर्धा आणि म्हशींची शर्यत पार पडली.
1/7
दिवाळीच्या पाडव्याचा दिवस.. सर्वत्र हलगीचा कडकडाट.. शिंगांना सुंदर मोरपीस चढवलेल्या म्हशी, त्यांच्या पायात घुंगराचा चाळ अन् चांदी-सोन्याचे तोडे आणि कवड्यांच्या माळ आणि त्या म्हैस मालकांचा अमाप उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशींच्या सौंदर्य स्पर्धा आणि म्हशी पळवण्याचा कार्यक्रम पार पडला. गेली कित्येक वर्ष जुनी अशी ही पंरपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे.

advertisement
2/7
दरवर्षी प्रमाणे कसबा बावड्यातील मार्केट परिसरात सकाळ पासूनच म्हैस मालकांची आपल्या म्हशींसह गर्दी झाली होती. मागील 15 वर्षांपासून बावड्यातील भारतवीर मित्र मंडळ दरवर्षी या सोहळ्याचे आयोजन करत असते. यंदाही सुंदर मी होणार या म्हशींच्या सौंदर्यस्पर्धेसाठी आजूबाजूच्या परिसरातील म्हशींचे मालक आपल्या लाडक्या म्हशीला सजवून मिरवण्यासाठी घेऊन आले होते.

3/7
दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी हा म्हशी सजविण्याचा पारंपरिक सोहळा पार पाडला जातो. सकाळसकाळी पंचगंगा नदीवर सर्व मालक आपल्या म्हशीला आंघोळ घालतात. त्यानंतर सुंदर रित्या सर्व म्हशींना सजवले जाते. काही म्हशींच्या अंगावर सुंदर नक्षीकाम तर काही म्हशींच्या अंगावर विविध सामाजिक संदेश लिहिलेले असतात. गळ्यात आणि पायात घुंगराची माळ, शिंगांवर मोरपीस, रिबीन लावून म्हशींना सजविण्यात येते.

4/7
मोटरसायकल सायलेंसर काढून मोठा आवाज करत गाडीच्या मागे म्हैस पळवणे, झेंडा दाखवत पळवणे अशा स्पर्धा भरवल्या जातात. या ठिकाणी म्हैस मालकांच्यात अनोखी ईर्षा बघायला मिळते. म्हशींच्या केशरचनेपासून ते तिच्या अंगावर दागिने घालण्यापर्यंत त्यांच्यात चढाओढ दिसून येत असते. तसेच म्हशींना दोन पायांवर उभे करण्याचे कौशल्यही यावेळी सर्वांना अनुभवता येते.

5/7
गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव आम्ही साजरे करत आलेलो आहोत. आपल्या म्हशींचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने करता येतो. मालक आणि मुके जनावर यांचे एकमेकांवर असलेले प्रेम य कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते.

6/7
खरंतर वर्षभरात जनावराने मालकासाठी केलेल्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा साजरा केला जातो, असे आयोजक असलेल्या भारतवीर मित्र मंडळाचे कार्यकर्ते मानसिंग जाधव यांनी सांगितले आहे.

7/7
कोल्हापुरातील कसबा बावड्याप्रमाणेच शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा नदी घाट, सागरमाळ, पाचगाव अशा ठिकाणी देखील दिवाळी पाडवा तसेच भाऊबीजेच्या दिवशी असे म्हशी पळवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर अशा स्पर्धा पाहण्यासाठी कोल्हापूरकर मोठी गर्दी करत असतात.

OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement