इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो, कोल्हापुरात का साजरा केला जातोय खास महोत्सव? VIDEO

Last Updated:

कोल्हापुरात या दिवशी बळीराजा महोत्सव साजरा केला जातो. सलग 18 व्या वर्षी यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

+
News18

News18

कोल्हापूर, 15 नोव्हेंबर : बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस आहे. खरंतर शेतकरीवर्गात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. 'इडा, पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो', अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. तर कोल्हापुरात या दिवशी बळीराजा महोत्सव साजरा केला जातो. सलग 18 व्या वर्षी यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
कशी सुरु झाली बळीराजा महोत्सव परंपरा
दरवर्षीप्रमाणे यंदाही बळीराजा महोत्सव समिती कोल्हापूर तर्फे बळीराजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बहुजनांचे नायक असलेल्या बळीराजाचे स्मरण करण्यासाठी समितीतर्फे 2005 सालापासून हा बळीराजा महोत्सव साजरा केला जातो. तसेच या बळीराजा महोत्सवांतर्गत 2008 सालापासून दरवर्षी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या 2 पुरुष आणि 1 महिला अशा कार्यकर्त्यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते, असे बळीराजा महोत्सव समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी सांगितले.
advertisement
यंदा कसा पार पडला बळीराजा महोत्सव
यंदा बलिप्रतिपदेच्या दिवशी संध्याकाळी बळीराजाच्या प्रतिमेच्या पूजनाने या महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. त्यानंतर कोल्हापूर शहरातून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. मिरजकर तिकटी-खासबाग मैदान-बिंदू चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-पापाची तिकटीमार्गे गंगावेश येथील श्री शाहू सत्यशोधक समाजाच्या कार्यालयासमोरील महात्मा फुले खुल्या सभागृहापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. धनगरी ढोल, लेझीम पथक आणि बळीराजाच्या वेशभूषेत खांद्यावर नांगर घेऊन असणारी एक व्यक्ती या मिरवणुकीत पाहायला मिळाली. मिरवणुकी नंतर सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात प्रबोधनात्मक काम करणाऱ्या डॉ. माधुरी चौगुले, शाहीर रंगराव पाटील, डॉ. अनमोल कोठडिया यांना बळीराजा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.
advertisement
ओवाळताना टिळा का लावतात? त्यामागे नेमका काय असतो धार्मिक दृष्टिकोन?
दरम्यान बळीराजाच्या या महोत्सवाच्या माध्यमातून बळीराजा महोत्सव समितीतर्फे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सध्याच्या अरजकतेच्या वातावरणात बळीराजाचे स्मरण करणे गरजेचे बनले आहे. त्यामुळेच या अशा बळीराजा महोत्सवाचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे देखील दिगंबर लोहार यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो, कोल्हापुरात का साजरा केला जातोय खास महोत्सव? VIDEO
Next Article
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement