शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा का करत नाहीत? तुम्हाला माहिती आहे का रहस्य?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
महादेवाच्या मंदिरात दर्शनानंतर अर्धीच प्रदक्षिणा मारली जाते. या प्रथेचं काय कारण आहे?
छत्रपती संभाजीनगर 4 सप्टेंबर : सर्व सणांमध्ये पवित्र समजला जाणारा श्रावण महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात महादेवाची आराधना केली जाते. महादेवाच्या सर्वच मंदिरात मोठी गर्दी असते. देवाचं दर्शन घेतल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा मारावी असा प्रघात आहे. पण, महादेव याला अपवाद आहेत. महादेवाच्या मंदिरात दर्शनानंतर अर्धीच प्रदक्षिणा मारली जाते. या प्रथेचं काय कारण आहे? याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील गुरुजी श्रीराम धानोरकर यांनी दिलीय.
प्रदक्षिणेला मोठं महत्त्व
आपल्या शास्त्रामध्ये प्रदक्षिणेचं मोठं महत्त्व आहे. देवी-देवता, मंदिर, झाडं, नर्मदासारख्या नदीची प्रदक्षिणेसह नगराची देखील प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे. या प्रदक्षिणेनंतर गेल्या जन्मातलं संचित पाप निघून जातं, अशी समजूत आहे. गर्भवती स्त्री ज्या पद्धतीनं सावकाश चालते त्याच पद्धतीनं आपण प्रदक्षिणा घातली पाहिजे, असं धानोरकर गुरुजी यांनी सांगितलं.
advertisement
महादेवाला अर्धी प्रदक्षिणा का?
महादेवाला अर्पण केलेलं दूध आणि पाणी वाहून जातं त्या ठिकाणी चंडीश्वर देवाची स्थापना झाली असते. या देवाला ओलांडू नये. त्याचबरोबर तिथं माता पार्वती शक्ती रुपानं विराजमान असते, त्याला ओलांडू नये, असा प्रघात आहे अशी माहिती धानोरकर यांनी दिली.
advertisement
मंदिराला प्रदक्षिणा घालताना ज्या ठिकाणी जलधार आहे तिथे नमस्कार करून आलेल्या मार्गाने परत जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घ्यायचं. शक्ती रूपाला कधी ओलांडायचं नाही . तिथे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते आपल्यामध्ये ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी तिथे नमन करायचं. त्यानंतर परत आलेल्या मार्गान जाऊन भगवान महादेवाचे दर्शन घ्यावे आणि आराधना करावी, असा सल्ला धानोरकर गुरुजींनी दिला.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
September 04, 2023 12:32 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/Temples/
शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा का करत नाहीत? तुम्हाला माहिती आहे का रहस्य?