नागपुरातील ही प्रसिद्ध शिव मंदिरं माहितीयेत का? श्रावणात नक्की घ्या दर्शन

Last Updated:
श्रावण हा महिना हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. विविध शिवमंदिरांत भाविकांची मोठी गर्दी असते.
1/9
श्रावण हा महिना हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. व्रत वैकल्यांचा महिना म्हणूनच श्रावणाची ओळख आहे. या काळात देशभरातील शिव मंदिरे आकर्षक पद्धतीने सजवलेली असतात. तसेच भक्तांचा मोठा मेळा या ठिकाणी पाहायला मिळतो.

advertisement
2/9
महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातही अनेक पुरातन शिवमंदिरे आहेत. नागपूरकर श्रावण महिन्याच्या पवित्र दिवसांमध्ये शहारातील काही प्रमुख आणि प्राचीन महादेव मंदिराचं दर्शन घेऊ शकतात.

3/9
इतवारी बाजारात असलेले जागनाथ बुधवारी हे मंदिर हे अतिशय पुरातन असून नागपूरचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात इतर अनेक मंदिरं आहेत. मंदिराच्या संपूर्ण भिंतींवर कोरीव काम करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विष्णूची 10 रूपे, महाभारत, रामायण , असे पुराणातील शिल्प कोरले आहेत.

4/9
नागपूरकर रघुजी भोसले महाराजांच्या कार्यकाळात सन 1785 साली तेलंगखेडी शिव मंदिराची निर्मिती करण्यात आली. विशेषतः हे मंदिर पांढरा संगमरवर दगड आणि काळया पाषाणाचा वापर करून बांधले आहे. नागपुरी बांधकाम शैलीचा प्रभाव या मंदिरावर प्रकर्षाने जाणवतो. तेलंगखेडी शिव मंदिर हे फुटाळा तलावाच्या नजिक वसलेले असून या मंदिराच्या शेजारीच तेलंगखेडी बाग आहे.

5/9
नागपुरातील महाल भागात असलेले प्रख्यात कल्याणेश्वर सर्व नागपूरकरांचे श्रद्धास्थान आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कार्यकाळात या मंदिराला वैभव प्राप्त झाले आहे.

6/9
महाल भागातील नागपूरकर भोसले यांच्या वाड्याजवळच जमिनीत महादेवाचे मंदिर आहे. हे शिवलिंग जमिनीत असल्याने त्याला पाताळेश्वर असं म्हंटलं जातं.

7/9
नागपुरातील नंदनवन भागात पुरातन बावडीमध्ये वसलेले शिव मंदिर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शहरात मध्यवर्ती भागात प्राचीन विहिरीमध्ये हे मंदिर आहे. विशेष म्हणजे हे मंदिर वर्षातून ठराविक दिवशीच उघडे असते. त्यामुळे महाशिवरात्री, श्रावण सोमवार आदी वेळी इथं मोठ्या संख्येनं भाविक येतात.

8/9
नागपुरातील नंदनवन भागात असलेली 51 फुटी मूर्ती नागपुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वात उंच उभी शिवमूर्ती आहे.

9/9
नागपूर - अमरावती महामार्गावर सुराबर्डी इथं शंकर-पार्वती आणि गणपतीची भव्य मूर्ती असलेलं मंदिरही प्रेक्षणीय ठिकाण आहे.

Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement