advertisement

100 फुटांचा उंच हुडा अन् पेटत्या शेणीचा थरारक खेळ, महाराष्ट्रातील 'या' गावाची होळी साजरी करण्याची अनोखी परंपरा!

Last Updated:

भारतात जवळपास प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी केली जाते. काही भाग असा आहे जिथे होळीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. जे बघण्यासाठी अनेक लोक दूरून त्या भागात येतात.

News18
News18
Holi 2026 : भारतात जवळपास प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी केली जाते. काही भाग असा आहे जिथे होळीच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. जे बघण्यासाठी अनेक लोक दूरून त्या भागात येतात. यावर्षी होळीचा सण हा 3 मार्चला साजरा केला जाणार आहे. अनेक राज्यात परंपरेनुसार होळीच्या उत्सवाला सुरुवात देखील झाली आहे. काशी, वृंदावन या प्रसिद्ध ठिकाणांच्या होळीच्या प्रथा आणि परंपरा अनेकांना माहितीच आहेत. पण सिंधुदुर्गातील या गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. सध्या सोशल मीडियावर या गावातील अनोख्या होळीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याबद्दल सविस्तर माहिती सोशल मीडियावरील सौरभ खंडागळे या इन्फ्लुएन्सरने दिली आहे.
कुठे साजरी केली जाते अनोखी होळी?
सिंधुदुर्ग जिल्हा हा त्याच्या निसर्गसौंदर्यासोबतच अंगावर शहारे आणणाऱ्या अद्भूत लोकपरंपरांसाठी ओळखला जातो. यातीलच एक सर्वात थरारक आणि अनोखी परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा 'हुडोत्सव'. होळीच्या उत्सवात जिथे रंगांची उधळण होते, तिथे कुणकेरीमध्ये भक्ती आणि शक्तीचा एक वेगळाच खेळ पाहायला मिळतो. यंदा हा प्रसिद्ध हुडोत्सव 8 मार्च 2026 रोजी साजरा होणार असून, त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
advertisement
हुडोत्सव म्हणजे काय?
'हुडा' म्हणजे साधारणपणे 100 ते 125 फूट उंचीचा एक गगनचुंबी लाकडी खांब. हा हुडा शिलंगण किंवा चव्हाट्यावर उभा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेपासून सुरू होणारा हा उत्सव सात दिवस चालतो. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे 'अवसार' म्हणजेच ज्यांच्या अंगात देवीचा संचार होतो अशा व्यक्ती, ज्या या उंच हुड्यावर चढतात आणि खाली हजारो भाविक उभे असतात आणि या उत्सवाचे साक्षीदार होतात.
advertisement
हुडोत्सवातील थरार
पेटत्या शेणींचा मारा: होळीच्या सहाव्या दिवशी रात्री हुड्याभोवती आणि होळीवर पेटत्या शेणी मारल्या जातात. मशालींच्या प्रकाशात होणारा हा अग्नीखेळ पाहताना काळजाचा ठोका चुकतो.
हुड्यावर चढण्याचा क्षण: सातव्या दिवशी मुख्य उत्सव असतो. अंगात संचार आलेले श्री भावई देवीचे अवसार या 100 फुटी उंच हुड्यावर शेंड्यापर्यंत चढतात. इतक्या उंचीवर कोणतीही सुरक्षा नसताना हे अवसार लीलया चढून जातात.
advertisement
या परंपरेमागील इतिहास आणि श्रद्धा
कुणकेरीचा हुडोत्सव हा केवळ करमणूक नसून ग्रामदैवत श्री सातेरी-भावई देवीच्या चरणी अर्पण केलेली भक्ती आहे. या उत्सवात शेजारच्या आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल आणि कोलगावचा श्री देव कलेश्वर हे देवीचे भाऊ मानले जातात. उत्सवाच्या दिवशी या देवांची रोंबाटे कुणकेरीच्या सीमेवर येतात आणि भावा-बहिणींची भेट घडते. उत्सवात 'वाघ' बनलेली माणसे आणि घोडेमोडणीचा खेळ हे देखील मोठे आकर्षण असते. लंडनहूनही काही भाविक केवळ या 'वाघाच्या खेळा'साठी दरवर्षी कुणकेरीला येतात. उंच हुड्यावर चढणे हे संकटांवर मात करून विजयाचे प्रतीक मानले जाते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
100 फुटांचा उंच हुडा अन् पेटत्या शेणीचा थरारक खेळ, महाराष्ट्रातील 'या' गावाची होळी साजरी करण्याची अनोखी परंपरा!
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement