धमाका केला, पण फुकट गेला... इंग्लंड दौऱ्यात इतिहास घडवणाऱ्या दोघांना Asia Cup मधून डच्चू!

Last Updated:

आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी मंगळवार 19 सप्टेंबरला मुंबईमध्ये निवड समितीची बैठक होणार आहे, पण इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या दोन खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

धमाका केला, पण फुकट गेला... इंग्लंड दौऱ्यात इतिहास घडवणाऱ्या दोघांना Asia Cup मधून डच्चू!
धमाका केला, पण फुकट गेला... इंग्लंड दौऱ्यात इतिहास घडवणाऱ्या दोघांना Asia Cup मधून डच्चू!
मुंबई : आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी मंगळवार 19 सप्टेंबरला मुंबईमध्ये निवड समितीची बैठक होणार आहे, पण टीम निवड करत असताना इंग्लंड दौरा गाजवलेल्या शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना धक्का बसू शकतो, असं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. इंग्लंड दौऱ्यामधल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये शुभमन गिलने तब्बल 750 रन केल्या होत्या. तर आयपीएल 2025 मध्येही गिलने 650 रन केले होते.
इंग्लंडमध्ये गिलने केलेल्या रन या टेस्ट क्रिकेटमधल्या होत्या, तर आयपीएल टी-20 फॉरमॅट असला तरी गिलने ओपनिंगला बॅटिंग केली होती. टीम इंडियाची निवड समिती सध्या अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांच्या यशस्वी ओपनिंग जोडीमध्ये कोणतेही बदल करू इच्छित नाहीये. आशिया कपसाठी तिसऱ्या ओपनरबाबत चर्चा करताना गिलचं नाव समोर येऊ शकतं, पण यशस्वी जयस्वाल या स्थानासाठी प्रबळ दावेदार आहे, त्यामुळे आशिया कपसाठी गिलचा पत्ता कट होऊ शकतो, पण टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर अडून राहिला तर मात्र गिलला लॉटरी लागू शकते.
advertisement

मिडल ऑर्डर निश्चित

मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांची नावं निश्चित मानली जात आहेत. तर आणखी एका जागेसाठी शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर हे दावेदार आहेत. आयपीएल 2025 मध्ये पंजाबला फायनलपर्यंत पोहोचवणारा त्यांचा कर्णधार श्रेयस अय्यर याचीही आशिया कपसाठी निवड होणं कठीण झालं आहे. दुसरा विकेट कीपर म्हणून आरसीबीच्या जितेश शर्माचा नंबर लागण्याची शक्यता आहे.
advertisement
इंग्लंडमधल्या टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या मोहम्मद सिराजचीही टीम इंडियात वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. जसप्रीत बुमराह आशिया कपसाठी उपलब्ध आहे, तसंच अर्शदीपही टी-20 फॉरमॅटचा स्पेशलिस्ट बॉलर आहे, त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षीत राणा यांच्यापैकी एक जण टीम इंडियासोबत युएईला जाईल. याशिवाय हार्दिक पांड्याच्या रुपात फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरही आहे, ज्याने टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकून भारताला विजय मिळवून दिला होता.
advertisement
कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, रवी बिष्णोई आणि अक्षर पटेल स्पिन बॉलिंगची धुरा सांभाळतील. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरची निवड झाली तर तोदेखील पर्याय म्हणून उपलब्ध असेल. टीम इंडियाने शेवटची टी-20 मॅच फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध खेळली होती, तेव्हा मोहम्मद शमी टीममध्ये होता, पण आता आशिया कपसाठी शमीची निवड होणार नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
धमाका केला, पण फुकट गेला... इंग्लंड दौऱ्यात इतिहास घडवणाऱ्या दोघांना Asia Cup मधून डच्चू!
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement