IND vs BAN : बांग्ला टायगर्सची शिकार करत भारताची फायनलमध्ये धडक, आशिया कप जेतेपदापासून एक पाऊल दूर

Last Updated:

दुबईच्या मैदानावर टीम इंडियाने बांग्लादेशचा 41 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.त्यामुळे आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पोहोचणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे.

India vs Bangladesh Super 4
India vs Bangladesh Super 4
India vs Bangladesh Super 4 : दुबईच्या मैदानावर टीम इंडियाने बांग्लादेशचा 41 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.त्यामुळे आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये पोहोचणारी टीम इंडिया पहिली टीम ठरली आहे.तर पराभूत झालेल्या बांग्लादेशला उद्या 25 सप्टेंबरला पाकिस्तान विरूद्ध सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकणारा संघ टीम इंडियासोबत फायनलमध्ये भिडणार आहेत.त्यामुळे हा संघ कोण ठरतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
टीम इंडियाने दिलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशची सुरूवात खराब झाली होती.कारण सलामीवीर तांजिद तमीम 1 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर सैफ हसन आणि परवेज इमोनने बांग्लादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान चांगला खेळत असलेला परवेज 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर तौहीद हृदोय 7, शमीम हुसेन शुन्य आणि जेकर अली शुन्य धावांवर बाद झाला होता.
advertisement
सैफ हसनने 69 धावांची एकाकी झूंज दिली पण त्याला बांग्लादेशला सामना जिंकवून देता आला नाही.आणि बांग्लादेश 127 धावांवर ऑल आऊट झाल आणि 41 धावांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळे टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.
advertisement
टीम इंडियाकडून कुलदीप यादव 3, जसप्रीत बुमराह वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या. आणि अक्षर पटेल आणि तिलक वर्माने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
टीम इंडियाकडून सलामीवीर अभिषेक शर्माने 75 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.या खेळीत त्याने 5 षटकार आणि 6 चौकार लगावले होते. अभिषेक व्यतिरीक्त शुभमन गिलने 29 धावा आणि हार्दीक पांड्याने 38 धावा जोडल्या.या धावांच्या बळावर भारताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 168 धावा केल्या होत्या.बांग्लादेशकडून रिषाद होसेने 2 विकेट काढल्या आहेत. तर तांजिम साकिब, मुस्ताफिजूर आणि सैफद्दीनने प्रत्येकी 1 विकेट काढल्या आहेत.
advertisement
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): सैफ हसन, तन्झिद हसन तमीम, परवेझ हुसेन इमोन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, जाकेर अली (कर्णधार-विकेटकीपर), मोहम्मद सैफुद्दीन, रिशाद हुसेन, तनझिम हसन साकिब, नसुम अहमद,
मुस्तफिजुर रहमान भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs BAN : बांग्ला टायगर्सची शिकार करत भारताची फायनलमध्ये धडक, आशिया कप जेतेपदापासून एक पाऊल दूर
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement