Washim : विहिरीजवळ चपला दिसल्या,पण काहीच फायदा झाला नाही,सगळंच संपलं, पती पत्नीच्या मृत्यूने वाशिम हादरलं

Last Updated:

वाशिममधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील सवासीन गावातील पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.

washim crime
washim crime
Washim Crime News : किशोर गोमाशे, वाशिम : वाशिममधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील सवासीन गावातील पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना घडली आहे.अमोल जगताप आणि सीमा जगताप अशी त्यांची नाव आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पण या घटनेत दोघा पती पत्नीचा विहिरीत बुडून नेमका मृत्यू कसा झाला? यामागे नेमकं कारण काय होतं? हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, सवासीन गावातील अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात काल सायंकाळी वाद झाला. या वादानंतर पत्नी सीमा जगताप या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत जाऊन उडी मारली होती. पत्नीला विहिरीत उडी मारताना पाहून अमोल जगताप यांनी देखील तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र दोघा पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता.
advertisement
दरम्यान अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप घरून निघून गेल्याने गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सूरू केली.यावेळी सीमा जगताप यांची चप्पल शेतातील विहिरी बाहेर दिसली होती.त्यानंतर त्यांनी विहिरीत सीमा जगताप आणि अमोल जगतापचा शोध घ्यायला सूरूवात केली. मात्र अंधार पडल्याने विहिरीतील शोध कार्य बंद करण्यात आले.त्यानंतर आज सकाळी पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने शोधकार्य सुरू केल्यानंतर त्या विहिरीतुन पती पत्नीचा मृतदेह शोधून वर काढण्यात आला.
advertisement
पती पत्नी मधील किरकोळ वादातून विहिरीत बुडून पती आणि पत्नीच्या झालेल्या मृत्यू मुळे त्यांचा एक 15 वर्षाचा मुलगा तसेच एक 12 वर्षांची मुलगी पोरकी झाली आहेत.सवासीन गावात शोककळा पसरली आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास मंगरुळपीर पोलीस करीत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Washim : विहिरीजवळ चपला दिसल्या,पण काहीच फायदा झाला नाही,सगळंच संपलं, पती पत्नीच्या मृत्यूने वाशिम हादरलं
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement