IND vs SA : तब्बल 49 वर्षांनंतर 'ग्रोव्हेल'चं भूत पुन्हा जिवंत, साऊथ अफ्रिकन कोचची टीम इंडियाला खुली धमकी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shukri Conrad Controversial statement : दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुकरी कॉनरॉड यांनी पत्रकार परिषदेत भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याची कोणतीही संधी सोडली नाही.
India vs South Africa : भारतात येऊन टेस्ट मॅच खेळणं कोणत्याही संघासाठी वर्ल्ड कप जिंकण्यासारखा आनंद असायचा. भारतात टेस्ट मालिका जिंकणं खायची गोष्ट नाही. एकेकाळी भारतातील कसोटी क्रिकेट मध्ये विजय मिळवणे कोणत्याही विदेशी संघासाठी जवळपास अशक्य मानले जात होते. मात्र, गेल्या एका वर्षात हे चित्र बदलताना दिसत आहे. 2024 मध्ये न्यूझीलंडने इथे येऊन टीम इंडियाचा 3-0 ने 'क्लीन स्वीप' केला आणि आता दक्षिण आफ्रिकेचा संघही याच मार्गावर आहे. अशातच साऊथ अफ्रिकेच्या कोचने थेट टीम इंडियाला आव्हान दिलीये.
भारताच्या जखमेवर मीठ चोळलं
सध्या गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांनी केलेलं एक विधान खूप चर्चेत आहे. मॅचच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुकरी कॉनरॉड यांनी पत्रकार परिषदेत भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याची कोणतीही संधी सोडली नाही. हसून बोलताना त्यांनी सांगितलं की, आम्ही हे शब्द उसने घेत आहे, पण आम्हाला भारतीय संघाला पूर्णपणे रगडायचे होते (We wanted to make India grovel). ते जितका जास्त वेळ मैदानावर पायावर उभे राहतील, तितका त्यांना त्रास होईल, असं साऊथ अफ्रिकेच्या कोचने म्हटलं आहे.
advertisement
1976 नंतर पुन्हा वादग्रस्त शब्द
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्या या विधानामुळे तणाव निर्माण झाला आहे. 1976 मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लंडचे दिवंगत कर्णधार टोनी ग्रेग यांनी दिलेल्या प्रसिद्ध मुलाखतीतील एक ओळ (We wanted to make WI grovel) तो चोरत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या विधानामुळे वेस्ट इंडिज संघ नाराज झाला होता, ज्याने मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला होता.
advertisement
शेवटच्या सेशनमध्ये जेव्हा विकेटवर...
आम्ही त्यांना घुटमळायला लावून, खेळातून बाहेर काढू इच्छितो आणि मग शेवटच्या दिवसासाठी चॅलेंज देऊ इच्छितो, असं साऊथ अफ्रिकेच्या कोचने म्हटलं आहे. कॉनरॉड यांनी स्पष्ट केलं की, भारतीय खेळाडू मैदानावर जास्त वेळ घालवून थकले पाहिजेत, जेणेकरून शेवटच्या दिवशी त्यांच्यासाठी फलंदाजी करणे कठीण होईल. तसेच, शेवटच्या सेशनमध्ये जेव्हा विकेटवर सावली पडते आणि वेगवान गोलंदाजांना थोडी मदत मिळते, तेव्हाच आपल्याला नवा बॉल मिळावा, यासाठी संघाने लवकर पारी घोषित केली नाही, असंही कॉनरॉड यांनी सांगितलं.
advertisement
भारतीय दिग्ग्जांमध्ये खळबळ
दरम्यान, साऊथ अफ्रिकेच्या कोचच्या वक्तव्याने सध्या क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. समालोकच आकाश चोप्रा याने, मला आशा आहे की भारतीय ड्रेसिंग रूममधील प्रत्येकाला त्याचा नेमका अर्थ काय आहे हे समजले असेल आणि क्रिकेटमध्ये कोणीतरी शेवटचा कधी वापरला होता याबद्दल थोडा इतिहासाचा धडा शिकवला असेल, असं आकाश चोप्रा म्हणाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : तब्बल 49 वर्षांनंतर 'ग्रोव्हेल'चं भूत पुन्हा जिवंत, साऊथ अफ्रिकन कोचची टीम इंडियाला खुली धमकी!


