Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट, 48 तासांत बदलणार हवा, IMD चा अलर्ट
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे. 48 तासानंतर विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तरेकडील थंड वार्‍याचे प्रवाह सुरूच असल्याने राज्यात पारा 7 अंशांच्या खाली घसरला आहे. धुळे येथे हंगामातील नीचांकी 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
कोल्हापूरमध्ये देखील गारठा वाढत असून दिवसाची सुरुवात साधारण 16.2 अंश सेल्सिअसच्या किमान तापमानाने होवून, जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे कमाल तापमान 30.7 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. सकाळी दाट धुक्यासह पडलेल्या थंडीचा गारवा दिवसभर टिकून राहील. दुपारी उन्हाचा चटका वाढला तरी सायंकाळी गारठा वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत किमान तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कमाल तापमानातही हळूहळू घट होत असली तरी तुरळक ठिकाणी पारा अद्यापही तिशीपार आहे. पुढील 48 तासांत हवामानात पुन्हा बदलाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी गडगडाटी पावसाची शक्यता आहे.










