Mumbai Local Special Trains : कल्याणहून पहाटे 2:30 तर पनवेलहून 2:40 ला धावणार विशेष लोकल; रेल्वेने का घेतला मोठा निर्णय जाणून घ्या
Last Updated:
Special Local Trains : मध्य रेल्वे काही कारणास्तव मध्यरात्री लोकल सेवा सुरु करणार आहे नेमकी किती दिवसांसाठी असेल ही सेवा आणि कारण काय ते जाणून घ्या.
मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईसह उपनगरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे. दररोज लाखोच्या संख्येने नागरिक यातून प्रवास करत असतात. अशातच सध्या या लोकल ट्रेनसंबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जिथे लोकल सेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल होणार आहे.
लोकल ट्रेनची सेवा पहाटे सुरु होऊन ती रात्री साधारण एक वाजेपर्यंत असते. मात्र आता ही सेवा चक्क प्रवाशांसाठी मध्य रात्री सुरु होणार आहे. ज्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नेव्ही मॅरेथॉन होय.
कारण काय?
मुंबईत होणाऱ्या नेव्ही हाफ मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वे शनिवारी मध्यरात्री दोन विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होणार आहेत, त्यामुळे त्यांना सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
advertisement
कसे असेल वेळापत्रक?
view commentsपहिली विशेष लोकल ही कल्याण स्टेशनवरून रात्री 2:30 वाजता सुटेल आणि ही लोकल सर्व स्थानकांवर थांबत सीएसएमटीला पहाटे 4 वाजता पोहचणार आहे तर हार्बर मार्गावरही एक विशेष लोकल धावणार आहे. ही लोकल पनवेलहून रात्री 2:40 वाजता सुटेल आणि सीएसएमटीपर्यंतचा प्रवास सर्व स्टेशनवर थांबत जाणार असून ही सीएसएमटीवरील पहाटे साधारण 4 वाजता पोहचेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 7:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Special Trains : कल्याणहून पहाटे 2:30 तर पनवेलहून 2:40 ला धावणार विशेष लोकल; रेल्वेने का घेतला मोठा निर्णय जाणून घ्या


