200 कोटींचं प्रॉफिट दाखवलं 30 कोटींचा चुना लावला, प्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्टर अडचणीत

Last Updated:

बॉलिवूडचा प्रसिद्ध डायरेक्टर अडचणीत सापडला आहेत. 200 कोटी देतो सांगून 30 कोटींचा चुना लावला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

News18
News18
बॉलिवूडमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही नवीन नाहीत. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर 30 कोटींच्या फसवणुकीचा आरोप लावला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. उदयपूरमधील एका डॉक्टराने विक्रम भट्ट यांच्यावर हे आरोप केले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात.
उदयपूरमधील एका डॉक्टराने पोलिसांत तक्रार दाखल करत विक्रम भट्ट यांनी त्यांना चित्रपटांत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विक्रम यांनी दावा केला होता की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 200 कोटींपर्यंत कमाई होऊ शकते. या विश्वासावर डॉक्टरांनी मोठी रक्कम गुंतवली. डॉक्टरांचा आरोप आहे की या प्रक्रियेत त्यांची 30 कोटींपेक्षा जास्त फसवणूक झाली.
advertisement
डॉक्टरांच्या तक्रारीत म्हटले आहे की विक्रम भट्ट यांच्या दिवंगत पत्नीवर आधारित बायोपिक करण्याचा प्लान होता. त्यासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली होती. 8 नोव्हेंबर रोजी भूपालपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीत विक्रम भट्ट यांच्यासोबत त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट, मुलगी कृष्णा भट्ट, उदयपूरचा रहिवासी दिनेश कटारिया आणि इतर काही लोकांची नावे घेतली आहेत. यात दिनेश कटारिया याने त्याच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दिनेश कटारियाने त्यांची ओळख एका संगीत ग्रुपद्वारे करून दिली. त्यानंतर 2024 मध्ये मुंबईला भेट दिली असताना दिनेशने डॉक्टरांची विक्रम भट्ट यांच्याशी प्रत्यक्ष भेट घडवली. पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रम यांनी डॉक्टरला संपूर्ण चित्रपट निर्मिती हाताळण्याचे आश्वासन दिलं होतं.
advertisement
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विक्रम यांनी डॉक्टरला वेळोवेळी पैसे पाठवण्यास सांगितलं. याच पद्धतीने 30 कोटींपेक्षा जास्त रक्कम त्यांनी दिल्याचा डॉक्टरांचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पुढे काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
200 कोटींचं प्रॉफिट दाखवलं 30 कोटींचा चुना लावला, प्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्टर अडचणीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement