Ghatkopar News : समोसा खाल्ल्याने 15 विद्यार्थ्यांना विषबाधा, घाटकोपरच्या शाळेत गोंधळ; नेमकं काय घडलं?
Last Updated:
Ghatkopar Shocking News : शाळेच्या कॅन्टीनमधील कापूर असलेला समोसा खाल्ल्याने अनेक विद्यार्थ्यांची अचानक प्रकृती बिघडली. उलट्या, चक्कर आणि पोटदुखी अशी लक्षणे दिसताच विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
मुंबई : घाटकोपर येथील एका शाळेतून धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. जिथे शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने तब्बल 15 ते 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
जेवणातील 'ही' जीवघेणी 'चूक'
मिळालेल्या माहितीनुसार,घाटकोपर पश्चिमेमधील एका शाळेतील सकाळच्या वेळेत (तारीख.17) सोमवारी हा प्रकार घडलेला आहे. विषबाधा झालेले हे विद्यार्थी इयत्ता पाचवी ते आठवतील असल्याची माहिती मिळत आहे. त्या दिवशी हे विद्यार्थ्यांनी शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाला त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. हा प्रकार पाहिल्यानंतर घाबरलेल्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावले तर काही पालकांनी मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले.
advertisement
नेमका 'हा' प्रकार कसा आला उघडकीस
शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या म्हणण्यांनुसार, त्या दिवशी त्यांनाही समोसा खाताना कापराचा वास आला होता त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध्ये जाऊन कोणालाही समोसा न देण्यास सांगितले. मात्र ज्या वेळेस विद्यार्थ्यांना त्रास झाला तेव्हा समजले की,समोसा करताना कोणत्याही शिळ्या भाजीचा वापर झालेला नाही तर समोसा करताना जे तेल वापरले त्यामध्ये देव्हाऱ्यात ठेवलेला कापूर त्या तेलात पडला होता.
advertisement
विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर...
view commentsसध्या पाच विद्यार्थ्यांवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या पालकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 8:55 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Ghatkopar News : समोसा खाल्ल्याने 15 विद्यार्थ्यांना विषबाधा, घाटकोपरच्या शाळेत गोंधळ; नेमकं काय घडलं?


