LIVE NOW

Bihar Election Result 2025 LIVE: बिहारचा पहिला कल हाती, भाजप आणि आरजेडीमध्ये काँटे की टक्कर

Last Updated:

Bihar Election Result 2025 LIVE: नितीश कुमार, विजय कुमार सिन्हा, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये... पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रचारसभांचा धडाका लावलेला.. त्यामुळे बिहारची जनता एनडीए की महागठबंधनला कौल देते याकड़े लक्ष लागलंय..

News18
News18
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे.. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलाय.. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीकडे किमान 122 जागा आवश्यक आहे. एनडीएतील भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर लोक जनशक्ती पार्टी 29 जागांवर आणि आरएलएम, एचएएम प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत.
November 14, 20258:34 AM IST

Live Update: जेडीयूची पोस्ट आणि चर्चांना उधाण, त्या एका फोटोनं निकालच सांगून टाकला?

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होताच, जनता दल (युनायटेड) ने सांगितले की, काही तासांत राज्यात सुशासन सरकार परत येत आहे.

November 14, 20258:33 AM IST

LIVE Update तेजस्वी यादव मैथिली ठाकूर आघाडीवर

बिहारच्या निकालाचा पहिला कल हाती आला आहे. ९६ जागांचा निकाल हाती आला आहे. एनडीए ६१ जागांवर आघाडीवर आहे. तर महाआघाडी ३७ जागांवर आघाडीवर आहे. मैथिली ठाकूर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव यांच्यासोबत नामांकीत चेहरे आघाडीवर आहेत. महाआघाडीला जोरदार धक्का बसला आहे.

November 14, 20258:22 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: बिहारमध्ये बदल घडणार - तेजस्वी यादव...

बिहारमध्ये बदल घडणार – तेजस्वी यादव…
नोकरी देणारं सरकार येणार तेजस्वी यादवची पहिली प्रतिक्रिया.

 

advertisement
November 14, 20258:20 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: एनडीए आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत, कोण पुढे?

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लाईव्ह अपडेट्स: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे ट्रेंड येत आहेत. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सध्या सुरू आहे. ट्रेंड एनडीए आणि महाआघाडीमध्ये चुरशीची लढत असल्याचे दर्शवितात. तथापि, सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये खूप जवळची लढत असल्याचे दिसून येते. एनडीए २४ जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी १६ जागांवर आघाडीवर आहे. तेजस्वी यादव स्वतः त्यांच्या राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. आतापर्यंत ४० जागांचे ट्रेंड जाहीर झाले आहेत.

November 14, 20258:11 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: बॅलेट बॉक्स उघडले, 46 सेंटर्सवर मतमोजणीला सुरुवात

बरोबर 8 वाजले आहेत. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बॅलेट बॉक्स उघडले, 46 सेंटर्सवर मतमोजणीला सुरुवात. 8.30 वाजता उघडणार EVM चा पेटारा, मोतिहारी परिसरात काहीशी तणावपूर्ण शांतता, मतमोजणी सेंटरबाहेर वॉटर कॅनन लावण्यात आले आहेत. काही क्षणात पहिले कल हाती येणार आहेत.

November 14, 20257:54 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा फायदा भाजपला होणार का? 

महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये देखील लाडकी बहीण सारखी योजना सुरू केली होती, मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा फायदा बिहारमध्ये होणार का? हे पाहावं लागणार आहे. थोड्याच वेळात फैसला येणार आहे. ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. संपूर्ण भारताचं लक्ष बिहारच्या निकालाकडे लागलं आहे. बिहारचा निकाल पुढच्या पाच वर्षांसाठी निर्णायक ठरू शकतो.

advertisement
November 14, 20257:38 AM IST

बिहार निवडणूक 2025: उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांचं देवाला साकड, निकालाआधी केली पूजा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी, प्रार्थना आणि पूजेचा काळ सुरू झाला आहे. महाआघाडी आणि एनडीएचे नेते त्यांच्या निकालांची वाट पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांनी अशोकधाम मंदिरात पूजा केली.

November 14, 20257:28 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर?

बिहार निवडणुतीत SIRवरून बराच गदारोळ उडाला होता.. पाहुयात एसआयआरमुळे मतदानाच्या टक्केवारीत काय फरक पडलाय.. आता पहिला मुद्दा पाहुयात एसआयआरसंदर्भातला…

SIR आधीची मतदार संख्या – 7.89 कोटी
SIR नंतर मतदार संख्या -7.42 कोटी

SIR नंतर घटलेली मतदार संख्या -65 लाख

2020 निवडणुकीतील मतदान – 57.29 %
2025 निवडणुकीतील मतदान – 66.91 %
मतदानाची वाढलेली टक्केवारी- 9.62%

November 14, 20257:18 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: बदल महत्त्वाचा, दुपारी चित्र स्पष्ट होईल- खासदार मनोज कुमार झा

बिहार निवडणूक २०२५ च्या मतमोजणीपूर्वी, राजद खासदार मनोज कुमार झा म्हणाले, “आम्ही बिहारच्या आशा आणि अपेक्षांसोबत उभे आहोत. राज्य बदलाकडे वाटचाल करत आहे. आज दुपारी सर्व काही स्पष्ट होईल. तेजस्वी यादव आणि महाआघाडीच्या नेतृत्वात बदल होईल.” ते पुढे म्हणाले, “मला वाटते की एक्झिट पोल हा भांडवलाचा खेळ आहे, बाजाराचा खेळ आहे, ‘सम्राटाचा’ खेळ आहे. आम्ही हा खेळ खेळत नाही…”

November 14, 20257:15 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: तेजस्वी की नितीश बिहारची खुर्ची कोण मिळवणार? निकालाची रणधुमाळी पाहा LIVE

बिहार निवडणुकीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट्स पाहा LIVE

November 14, 20257:01 AM IST

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीवर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांची भविष्यवाणी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आज दिवस आहे आणि आता अवघ्या काही तासांतच निकाल जाहीर होतील. या निकालाच्या पार्श्वभूमीवर, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विजय कुमार सिन्हा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विजय कुमार सिन्हा म्हणाले, “निवडणूक कोण जिंकणार, हे जनता ठरवेल. काही परिवारवादी लोक राजकारणाला आपली खासगी मालमत्ता समजतात. पण बिहारची जनता अशा युवराजांना थेट मेसेज निकालातून देईल.” बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा असून, दोन टप्प्यांत मतदान पार पडले आहे. आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल की बिहारमध्ये सत्ता कोणाची येणार.

November 14, 20256:57 AM IST

Bihar Nivdanuk nikal Live: बिहार निवडणूक निकालाआधीच भाजपकडून खास निर्देश

बिहार निवडणूक निकालांबाबत भाजपने एक निर्देश जारी केले. सर्व पक्ष नेत्यांना आणि इतर पक्ष सदस्यांना अतिरेकी उत्सव टाळण्याचे निर्देश दिले आहेत. पक्ष मुख्यालयात फक्त साधे उत्सव अपेक्षित आहेत. कार्यकर्त्यांना फटाके आणू नका किंवा बँड वाजवू नका असे सांगण्यात आले आहे. दिल्ली बॉम्बस्फोटांची संवेदनशीलता लक्षात ठेवली पाहिजे असे वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे.

November 14, 20256:53 AM IST

Bihar Election Result 2025 LIVE: निकालाआधी समजून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज (१४ नोव्हेंबर) मतमोजणी होत आहे. राज्यातील सर्व २४३ जागांसाठी आज फैसला होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने बिहारमधील ३८ जिल्ह्यांमध्ये एकूण ४६ मतमोजणी केंद्रे सज्ज केली आहेत.

मतदानाचे मोठे रेकॉर्ड आणि महिलांची निर्णायक भूमिका:
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ दोन टप्प्यांत घेण्यात आली – पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला, तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला पार पडला. या निवडणुकीत एकूण मतदान ६६.९१% झाले, जो १९५१ नंतरचा सर्वाधिक मतदानाचा उच्चांक आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांचे मतदान ७१.६% इतके होते, तर पुरुषांचे मतदान ६२.८% राहिले. बिहारच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त संख्येने मतदान करून निवडणुकीत आपले निर्णायक मत नोंदवले आहे.

प्रमुख लढत आणि एग्झिट पोल्सचा कल:
बिहार निवडणुकीत एनडीए आणि महागठबंधनयांच्यात प्रमुख लढत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये भाजप आणि जेडीयूला प्रत्येकी १०१-१०१ जागा वाटप करण्यात आल्या आहेत. तर, विरोधी महागठबंधनाची धुरा तेजस्वी यादव यांच्या हाती आहे. तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या २० वर्षांच्या सत्तेला थेट आव्हान दिले आहे.

बहुतांश एग्झिट पोल्समध्ये एनडीएलाच आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘न्यूज१८ इंडिया’च्या एग्झिट पोलमध्येही एनडीएलाच बहुमत मिळण्याचे संकेत आहेत.

मतमोजणीची तयारी आणि प्रक्रिया:
मतमोजणीच्या तयारीसाठी ३८ जिल्ह्यांतील ४६ केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीसाठी ४,३७२ काउंटिंग टेबल्स आणि १८,००० हून अधिक एजंट्स नियुक्त करण्यात आले आहेत.

मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी ८ वाजता सुरू होत आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मोजणी होईल आणि त्यानंतर सकाळी ८:३० वाजल्यापासून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्सची मोजणी सुरू होईल. या संपूर्ण प्रक्रियेवर २४३ रिटर्निंग ऑफिसर आणि ऑब्झर्व्हर्स लक्ष ठेवून आहेत. आज सायंकाळपर्यंत निवडणुकीचे अंतिम निकाल येण्याची अपेक्षा आहे. बिहारमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार, एनडीएचा विजय होतो की महागठबंधन उलटफेर करते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

November 14, 20256:48 AM IST

Bihar Election Result LIVE: भाजपच्या हातून बिहार जाणार की कमळ फुलवण्यात यश येणार?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होत आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे.. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलाय.. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीकडे किमान 122 जागा आवश्यक आहे. एनडीएतील भाजप आणि जेडीयू प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवत आहे. तर लोक जनशक्ती पार्टी 29 जागांवर आणि आरएलएम, एचएएम प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत.

दुसरीकडे महागठबंधमधील आरजेडी 143 जागांवर, काँग्रेस 61 जागांवर, सीपीआयएमएल 20 जागांवर, वीआयपी 13 जागांवर, सीपीआय 4 आणि सीपीआय 9 जागांवर निवडणूक लढवत आहेत.. सध्या बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार आहे, तर राजदचे तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे नितीश कुमार, विजय कुमार सिन्हा, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रचारसभांचा धडाका लावलेला. त्यामुळे बिहारची जनता एनडीए की महागठबंधनला कौल देते याकड़े लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या/देश/
Bihar Election Result 2025 LIVE: बिहारचा पहिला कल हाती, भाजप आणि आरजेडीमध्ये काँटे की टक्कर
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement