Bihar Results: महाराष्ट्रात फेल… पण बिहारमध्ये धमाका, दोन्ही आघाड्यांना टेन्शन वाढले; AIMIMने राजकीय वारे बदलले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Bihar Election Results: महाराष्ट्रात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेली AIMIM बिहारमध्ये मात्र मोठा उलथापालथ घडवतेय. सीमांचलच्या पाच महत्त्वाच्या जागांवर आघाडी घेत पक्षाने महागठबंधन आणि एनडीए दोघांचेही गणित विस्कटले आहे.
पाटणा: बिहारसाठी आज निर्णायक दिवस आहे. राज्यातील २४३ विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात राज्यात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार असल्याचे शक्यात दिसत आहे. आता सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळणार याची उत्सुकता आहे. अशात एक मोठी अपडेट समोर येत आहे ज्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनी राजकीय चित्राला अनपेक्षित वळण दिले आहे. मुस्लिमबहुल आणि सीमावर्ती भागांमध्ये मजबूत पकड असलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने यंदा आघाडीची ठसा उमटवायला सुरुवात केली आहे. पक्ष पाच महत्त्वाच्या जागांवर आगेकूच करत असल्याचे ट्रेंड्स दर्शवतात.
advertisement
कोण जिंकणार बिहार? Geminiने हात जोडले, Chatgptचा सांगितला धक्कादायक निकाल
सध्याच्या आकडेवारीनुसार AIMIM बहादुरगंज, कोचाधामन, अमौर, बैसी आणि बलरामपुर या पाच जागांवर आघाडीवर आहे. या सर्व जागा किशनगंज, अररिया आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये येतात, जिथे असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाला मागील काही वर्षांत चांगले पाय रोवण्यास यश मिळाले आहे. काडापाडा समीकरणं, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव आणि धार्मिक ध्रुवीकरण या सर्व घटकांचा AIMIM च्या आघाड्यांमध्ये मोठा वाटा असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
बहादुरगंज आणि अमौर या जागांवर AIMIM ने मागील निवडणुकांमध्येही जोरदार कामगिरी दाखवली होती. यंदा पुन्हा आघाडी मिळाल्याने या भागांमध्ये AIMIM ला मिळणारा स्थिर पाठिंबा स्पष्ट दिसतो.
कोचाधामन आणि बैसी या जागांवर मात्र मुकाबला अटीतटीचा असून, अंतिम निकालापर्यंत नाट्यमय बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
बलरामपुर ही जागा पारंपरिकरित्या डावे आणि क्षेत्रीय पक्षांची होती, पण AIMIM पुढे असल्याने स्थानिक राजकारणात मोठे समीकरण बदलल्याचे संकेत आहेत.
राजद-काँग्रेस महागठबंधन आणि एनडीए यांच्या पारंपरिक लढतीमध्ये AIMIM ची आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी चिंता बनली आहे. विशेषत: राजदच्या मुस्लिम-यादव (MY) समीकरणाला AIMIM कडून थेट धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
advertisement
अंतिम निकाल येईपर्यंत चित्र बदलू शकते, मात्र सध्या तरी AIMIM ने सीमांचलच्या पाच महत्त्वाच्या जागांवर प्रभावी उपस्थिती दाखवत तिसऱ्या शक्तीचे अस्तित्व ठसवण्यास सुरुवात केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 10:05 AM IST
मराठी बातम्या/देश/
Bihar Results: महाराष्ट्रात फेल… पण बिहारमध्ये धमाका, दोन्ही आघाड्यांना टेन्शन वाढले; AIMIMने राजकीय वारे बदलले


