कृषी हवामान : थंडीची मोठी लाट येणार! पशूंसह रब्बी पिकांची काय काळजी घ्याल? IMD ने दिला महत्वाचा सल्ला
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला - थंडीचा शेती आणि पशुधनावर लक्षणीय परिणाम होतो. परिणामी, आयएमडीच्या अ‍ॅग्रोमेट विभागाने शेतकऱ्यांना पिके आणि पशुधनाची काळजी आणि संरक्षण याबाबत सल्ला दिला आहे. त्यानुसार, तापमानात घट होण्याचा शेतावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी संध्याकाळी हलके पाणी द्या. भाजीपाला रोपवाटिका आणि छोट्या रोपांना पॉलिथिन किंवा मल्चिंगने झाकून ठेवा. केळीच्या घडांना 6% छिद्रित पॉलीबॅग्जने झाकून थंडीपासून वाचवा. असं सांगण्यात आले आहे.
advertisement
advertisement
advertisement


