संगीतसृष्टीवर शोककळा! वयाच्या 34 व्या वर्षी प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, आईचे मॅनेजरवर गंभीर आरोप
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध गायकाचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन झालं आहे. तो तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या आईने इव्हेंट ऑर्गनाइज करणाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.
मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आजारी आहे तर अनेकजण काळाच्या पडद्याआड गेले. अशातच आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. 34 वर्षांच्या गायकाचं निधन जालं आहे. त्याच्या निधनाने संगीतसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गायकाने इतक्या कमी वयात जगाचा निरोप घेतल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
हुमाने सागर असं गायकाचं नाव असून तो ओडिया गायक आहे ओडियामध्ये हुमाने सागरची अनेक गाणी लोकप्रिय आहे. हुमानेचं सोमवारी निधन झालं. त्याच्या निधनाची बातमी ऐकताच सगळे शॉक झालेत.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, हुमानेचं निधन मल्टी ऑर्गन डिसफंक्शनमुळे झालं आहे. गेली अनेक दिवस त्याची तब्येक ठीक नव्हती. त्याच्यावर तीन AIIMS भुवनेश्वर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला तात्काळ ICU मध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. काही टेस्ट केल्यानंतर कळलं की त्याच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनी काम करणं बंद केलं आहे. एक्यूट-ऑन-क्रोनिक लिवर फेल्योर, बाइलेटरल न्यूमोनिया, डायलेटेड कार्डियोमायोपॅथी सारखे गंभीर आजार त्याला झाले होते. त्याची तब्येत दिवसेंदिवस आणखीच बिघडत चालली होती. अखेर सोमवारी संध्याकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.
advertisement
मिळालेल्या माबितीनुसार, हुमानेची आई शेफाली यांनी त्याच्या मॅनेजर आणि इव्हेंट ऑर्गनायझरवर गंभीर आरोप लावले आहेत. त्याची तब्येत ठीक नसतानाही त्याला स्टेज परफॉर्मन्ससाठी जबरदस्ती केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्या परफॉर्मन्सनंतर त्याची तब्येत आणखी बिघडल्याचं त्यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 9:22 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
संगीतसृष्टीवर शोककळा! वयाच्या 34 व्या वर्षी प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, आईचे मॅनेजरवर गंभीर आरोप


