Guava Recipe Video : पेरूचा हलवा, एकदा खाल तर गाजरचा हलवा कायमचा विसरून जाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Guava Halwa Recipe Video : हलवा म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतं ते गाजर. गाजरचा हलवा, त्यानंतर दुधीचा हलवा. हे तुम्ही खाल्लं असेलच. पण पेरूचा हलवा, वाचूनच थोडं विचित्र वाटेल. पण एकदा हा हलवा तुम्ही बनवाल आणि खाल तर गाजरचा, दुधीचा हलवाही विसरून जाल.
बाजारात आता पेरू दिसतील. पेरू एक फळ जे आपण असंच खातो. पण याशिवाय पेरूपासून आणखी काही पदार्थही बनतात. जसं की पेरूचं चाट, पेरूचं लोणचं, पेरूची चटणी आणि पेरूची भाजीही. पण तुम्ही कधी पेरूचा हलवा खाल्ला आहेत का? खाणं दूर तुम्हाला नाव वाचूनच आश्चर्य वाटलं असेल. पेरूचा हलवा ही भन्नाट रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
हलवा म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतं ते गाजर. गाजरचा हलवा, त्यानंतर दुधीचा हलवा. हे तुम्ही खाल्लं असेलच. पण पेरूचा हलवा, वाचूनच थोडं विचित्र वाटेल. पण एकदा हा हलवा तुम्ही बनवाल आणि खाल तर गाजरचा, दुधीचा हलवाही विसरून जाल. आता पेरूचा हलवा कसा बनवायचा, त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहुयात.
advertisement
पेरू हलव्यासाठी साहित्य
पेरू
साखर किंवा गूळ
दूध
ड्रायफ्रूट्स
वेलची पावडर
तूप
पेरू हलवा बनवायचा कसा? कृती
पेरूच्या देठाकडील भाग कापून घ्या. शक्यतो बिया कमी असतील असा पेरू घ्या. छोट्या देशी पेरूमध्ये बिया खूप असतात मग तो उकळून, मॅश करून गाळून घ्या. नाहीतर दुसरे पेरू असतील तर ते छोट्या किसणीवर किसा जेणेकरून त्याच्या बिया किसलेल्या पेरूत येणार नाहीत.
advertisement
आता यात रंगासाठी थोडं बीट किसून घ्या. बिटाऐवजी तुम्ही फूड कलरही वापरू शकता. बिटामुळे चांगला कलर येतो. असा कलर फूड कलरमुळे मिळणार नाही
आता गॅसवर कढई गरम करा. त्यात एक चमचा तूप टाका. गॅस मध्यम आचेवर ठेवा. यात किसलेला पेरू टाका आणि नीट परतून घ्या. 5 मिनिटं परतून घ्या. पेरूचा किस चांगला शिजेल नरम होईल. आता यात अर्धा कप कोमट दूध टाका. थंड दूध टाकू नका. एक-दोन मिनिट परतून घ्या. आता यात मावा टाका. माव्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरही टाका. अर्धा कप साखर टाका. तुम्ही गूळही वापरू शकता. आता साखर विरघळत नाही, मावा नीट मिक्स होत नाही तोपर्यंत म्हणजे जवळपास 3-4 मिनिटं ढवळत राहा.
advertisement
यातील पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत ढवळत राहा. काही वेळाने गाजरच्या हलव्यासारखा जाड होईल. आता यात ड्रायफ्रुट्स आणि हवं असल्यास वेलची पावडर टाका. पण पेरूची स्वतःची एक चव असते, त्यामुळे वेलची नाही टाकली तरी चालेल, असा सल्ला महिलेने दिला आहे.
advertisement
युट्युब चॅनलेवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा पेरूचा हलवा करून पाहा आणि कसा झाला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही पेरूपासून आणखी अशी कोणती वेगळी रेसिपी बनवत असाल तर तीसुद्धा आमच्यासोबत शेअर करा.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 18, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Guava Recipe Video : पेरूचा हलवा, एकदा खाल तर गाजरचा हलवा कायमचा विसरून जाल


