Recipe Video : थंडीत बनवा कुळीथाचं माडगं; यासमोर चहा, कॉफी, ग्रीन टी सगळं वाटेल फिकं

Last Updated:

Kulith Mandga Recipe Video : अनेकांना कुळीथाची पिठी किंवा पिठलं, कुळीथाची आमटीही खायला, प्यायला आवडते. पण कुळीथाचं माडगं तुम्ही कधी ट्राय केलं आहे का?

News18
News18
थंडी सुरू झाली की काहीतरी गरमागरम खावंप्यावंसं वाटतं. मग यात चहा, कॉफी, गरमागरम भजी आणि जेवणात म्हणायचं तर अनेकांना कुळीथाची पिठी किंवा पिठलं, कुळीथाची आमटीही खायला, प्यायला आवडते. पण कुळीथाचं माडगं तुम्ही कधी ट्राय केलं आहे का?
आजवर तुम्ही कुळीथ पिठापासून पिठलं बनवलं असेल पण आता कुळीथाचं माडगं हा काय प्रकार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एक स्थानिक पारंपारिक असा हा पदार्थ. कुळीथाचं मांडगं म्हणजे कुळीथापासून बनवलेला हा एक वेगळ्या प्रकारचा चहाच म्हणा. हा कुळीथाचा चहा तुम्ही एकदा का प्यायलात तर याच्यासमोर तुम्हाला चहा, कॉफी आणि ग्रीन टीही फिका वाटेल. संपूर्ण थंडीत किंबहुना थंडी संपली तरी तुम्ही हाच चहा प्याल.
advertisement
आता कुळीथाचं माडगं कसं बनवायचं त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहुयात.
कुळीथाचं माडगं बनवण्यासाठी साहित्य
कुळीथ
पाणी
गूळ
शिजवलेला भात
मीठ
कुळीथाचं माडगं कसं बनवायचं? कृती
कुळीथ तव्यावर चांगले भाजून घ्या. ते जाडसर भरडून त्यातील कोंडा काढून घ्या. आता एका भांड्यात पाणी घ्या. त्यात भरडलेले कुळीथ मिक्स करून घ्या. आता गॅसवर दुसरं भांडं ठेवून त्यात पाणी गरम करून घ्या. गूळ टाका, गूळ वितळलं की पाण्यात भिजवलेली कुळीथाची भरड, थोडा शिजलेला भात आणि मीठ टाकून चांगलं शिजवून घ्या. कुळीथाचं माडगं तयार.
advertisement
टेस्टी चव फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही कधी कुळीथाचं माडगं बनवलं होतं का? प्यायला होतात का? नसेल तर कुळीथाचं माडगं एकदा बनवून पाहा आणि कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
तुम्ही कुळीथापासून अशी काय वेगळी रेसिपी बनवता, याशिवाय तुमच्याकडेही अशा काही पारंपारिक रेसिपी असतील तर त्याची माहिती आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Recipe Video : थंडीत बनवा कुळीथाचं माडगं; यासमोर चहा, कॉफी, ग्रीन टी सगळं वाटेल फिकं
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement