Papad Recipe : पापडावर बेसन पीठ, एकदम नवीन पदार्थ; पोट भरेल पण मन म्हणेल आणखी खा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Recipe From Papad : भाजून, तळून तर पापड तुम्ही दररोज खाता आता आम्ही तुमच्यासाठी पापडापासून एकदम नवीन अशी रेसिपी आणली आहे. पापडावर बेसन पीठ लावून बनवायची ही रेसिपी.
थंडीत जेवताना तोंडाला पापड... काही वेगळीच मजा... सामान्यपणे पापड आपण भाजून किंवा तळून खातो किंवा मसाला पापड, पापड चाट असं काहीतरी बनवून खातो. तसे पापडापासून काही पदार्थही बनवले जातात. पण आम्ही तुमच्यासाठी पापडापासून एकदम नवीन अशी रेसिपी आणली आहे. पापडावर बेसन पीठ लावून बनवायची ही रेसिपी.
एका भांड्यात एक वाटी बेसन पीठ, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा टाकून नीट मिक्स करून घ्या. सर्व साहित्य एकत्र झालं की थोडंथोडं पाणी टाकून पातळ मिश्रण तयार करून घ्या. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळही नसावं.
advertisement
आत पापड घ्या आणि ते पाण्यात भिजवून घ्या. जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही. हा पापड पोळपाट किंवा ताटात घ्या आणि वर तयार केलेलं बेसनचं मिश्रण त्यावर लावून घ्या. आता पापडाचा रोल करून घ्यायचा आहे. 4 पापड असतील तर तिघांचे रोल करून घ्यायचे आणि एक पापड तसाच ठेवायचा आहे. एका तव्यात थोडं तेल घेऊन त्यात तयार केलेले पापडाचे रोल खरपूस शॅलो फ्राय करून घ्या. दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या. आता हे रोल बाजूला काढून घ्या आणि ठेवलेला एक पापड याच तेलात तळून घ्या. तो बाजूला ठेवा.
advertisement
आता याच तेलात कांदा टाकून सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्या. तो तव्यावरच एका बाजूला ठेवा. सुकं खोबरं भाजून घ्या. आता कांदा आणि खोबरं मिक्स करून घ्या. यात अर्धा इंच आलं आणि सात ते आठ लसूण पाकळ्या घालून सगळं मिनिटभर भाजून घ्या. हे मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात कोथिंबीर आणि पाणी टाकून बारीक वाटून घ्या.
advertisement
आता एक कढई घ्या, गॅसवर ठेवा. त्यात एक ते दीड चमचा तेल, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, एक चमचा बेसन पीठ घालून नीट भाजून घ्या. आता यात तयार केलेलं वाटण घाला, ते नीट मिक्स करून घ्या. यात एक चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा कश्मिरी लाल मिरची, पाव चमचा गरम मसाला घालून सगळे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किती पातळ हवी त्यानुसार पाणी घालून घ्या. ग्रेव्हीला एक उकळी येऊ द्या.
advertisement
तोपर्यंत तयार केलेल्य पापड रोलचे तुकडे करून घ्या. ग्रेव्हीला उकळी आली की त्या हे पापड टाका, तळलेला एक पापड कुस्करून यात टाका. नीट ढवलून झाकण ठेवून 5-6 मिनिटं नीट शिजवून घ्या. ही चमचमीत अशी पापडाची भाजी तयार झाली.
advertisement
Vandana kitchen Marathi या युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही रेसिपी करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 15, 2025 9:00 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Papad Recipe : पापडावर बेसन पीठ, एकदम नवीन पदार्थ; पोट भरेल पण मन म्हणेल आणखी खा


