Amla Recipe : आवळ्याचं लोणचं, चटणी, मुरांबा तर बनवताच; आता बनवून पाहा नेल्लीकाई सद्दाम

Last Updated:

Amla Recipe Video : नेल्लीकाई सद्दाम यात आवळ्याचं नाव तर कुठेच नाही. नक्की ही आवळ्याची रेसिपी आहे तरी काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

News18
News18
आता बाजारात आवळे आले आहेत. त्यामुळे आवळे विकत घेऊन ते मिठाच्या पाण्यात घालून वर्षभरासाठी साठवले जात आहेत. याशिवाय आवळ्यापासून लोणचं, चटणी, मुरांबा, कँडी असे बरेच पदार्थ बनवले जातात. पण आता आवळ्यापासून यापेक्षा वेगळी अशी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे, ती म्हणजे नेल्लीकाई सद्दाम.
नेल्लीकाई सद्दाम नाव वाचून तुम्हाला अजब वाटलं असेल. कारण सामान्यपणे कोणताही पदार्थ म्हटला की त्याचं नाव त्यात असतं. म्हणजे आवळ्यापासून बनवले जाणारं लोणचं म्हणजे आवळ्याचं लोणचं, चटणी म्हणजे आवळ्याची चटणी, मुरांबा म्हणजे आवळ्याचा मुरांबा. नेल्लीकाई सद्दाम यात आवळ्याचं नाव तर कुठेच नाही. नक्की ही रेसिपी आहे तरी काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.
advertisement
आता नेल्लीकाई सद्दाम बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार ते पाहुयात
2 कप तांदूळ
4 मोठे आवळे
चिमूटभर हिंग
मीठ
फोडणीसाठी
एक टेबलस्पून तूप किंवा तिळाचं तेल
अर्धा टीस्पून मोहरी
1 टीस्पून उडद डाळ
2 टीस्पून चणा डाळ
advertisement
2 टेबलस्पून शेंगदाणे
5 हिरव्या मिरच्या
कडीपत्ता
चिमूटभर हिंग
नेल्लीकाई सद्दाम बनवायचा कसा? कृती
प्रेशर कुकरमध्ये मीठ आणि तूप घालून भात शिजवून द्या. आता आवळा किसून घ्या. कढई गरम करा त्यात तेल टाकून फोडणीसाठी दिलेलं सर्व साहित्य टाका. एक मिनिटभर मध्यम आचेवर नीट परतून घ्या. डाळ आणि शेंगदाणे ब्राऊन रंगाचे झाले की त्यात किसलेला आवळा घाला. आवळा जाडसर किसला गेला असेल तर त्यात थोडं पाणी घाला, आवळ्याचा मूळ रंग बदलू देऊ नका.
advertisement
आता गरजेनुसार  मीठ, हिंग घाला आणि चांगले मिसळा. गॅस बंद करून आता यात शिजवलेले भात घाला आणि चांगला मिक्स करून घ्या. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घ्या.



 










View this post on Instagram























 

A post shared by Rajeswari Vijayanand (@rakskitchen)



advertisement
हा तुमचा नेल्लीकाई सद्दाम तयार.... आता याचं नाव नेल्लीकाई सद्दाम का? तर हा दक्षिण भारतातील पदार्थ आहे. नेल्लीकाई म्हणजे आवळा आणि नेल्लीकाई सद्दाम म्हणजे आवळा राइस किंवा आवळ्यापासून बनवलेला भात.
@rakskitchen इन्स्टाग्रामवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा आवळा राइस करून पाहा आणि तो कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Amla Recipe : आवळ्याचं लोणचं, चटणी, मुरांबा तर बनवताच; आता बनवून पाहा नेल्लीकाई सद्दाम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement