Recipe Video : खरडन पिठलं कधी खाल्लंय का? पिठल्याचा वेगळाच प्रकार, भलतंच टेस्टी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Khardan Pithala : खरडन पिठलं... नाव वाचूनच तुम्हाला अजब वाटलं असेल. पण जेव्हा तुम्ही ही रेसिपी पाहाल तेव्हाच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.
मुंबई : थंडी लागली की गरमागरम पिठलं किंवा झुणका खावासा वाटतं. मग तो कुळीथाचा असो वा बेसनचा. झुणका, पिठलं तसं जवळपास बहुतेक भागात मिळणारा पदार्थ. पण तो बनवण्याची पद्धत मात्र वेगवेगळी. आता झुणका आणि पिठल्यापेक्षा वेगळा असा प्रकार. खरडन पिठलं... ज्याची रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
खरडन पिठलं... नाव वाचूनच तुम्हाला अजब वाटलं असेल. पण जेव्हा तुम्ही ही रेसिपी पाहाल तेव्हाच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. खान्देशातील हा पदार्थ आहे. ज्याला काही जण खरवड पिठलं किंवा खरपूड असंही म्हणतात. काही खान्देशातील लोकांना हा पदार्थ माहिती असेलच. पण महाराष्ट्रातल्या कित्येकांसाठी विशेषत: शहरात राहणाऱ्यांसाठी हा पदार्थ अनोखा आहे. आता हे खरडन पिठलं काय, कसं बनवायचं पाहुयात.
advertisement
साहित्य
जिरं
बारीक चिरलेला कांदा
हिरवी मिरची
हळद
मीठ
बेसन
पाणी
बारीक चिरलेला लसूण
सुकी हिरवी मिरची
मीठ
तेलमिश्रित पाणी
कृती
गॅसवर पॅन ठेवा त्यात तेलमिश्रित पाणी टाका. मग जिरं, बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका. नंतर हळद आणि मीठ टाकून थोडं परतून घ्या. आता यात बेसन पाण्यात मिक्स करून ते ओता आणि आणि ढवळत राहा. तुम्ही पाहाल तर जसजसं तुम्ही बेसन परतत राहाल तसं ते त्या पॅनला चिकटत जाईल आणि वरचं बेसन सुटत जाईल. बेसन ढवळताना वरून थोडं तेलमिश्रित पाणी टाकत जा.
advertisement
आता पॅनवर सुटलेलं बेसन म्हणजे पिठलं एका भांड्यात काढा. आता पॅनला चिकटलेलं बेसन हळुवारपणे काढा. अगदी डोसासारखं हे बेसन निघेल. ते त्या पिठल्यावर ठेवा.
आता काळी मिरी, वेलची, काजू चुरी, मगज चुरी हलकं तव्यावर भाजून त्याचा मसाला तयार करा. आता तेलमिश्रित पाण्यात जिरं, बारीक केलेला लसूण, सुकी लाल मिरची आणि तयार केलेला मसाला टाकून परतून खरडन पिठल्यावर याची फोडणी द्या.
advertisement
रोजच्या झुणका, पिठल्यानंतर आता हे वेगळ्या पद्धतीचं खरडन पिठलं एकदा बनवून पाहा आणि ते कसं झालं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 12, 2025 9:01 AM IST


