दिल्ली स्फोटानंतर Crack Down सुरू, दहशतवादी उमरचं घर IED ने उडवलं

Last Updated:

Delhi Red Fort Car Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारचा स्फोट घडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मदचं पुलवामा येथील घर सुरक्षा दलाने आयईडीने उडवून दिलं आहे.

News18
News18
Delhi Red Fort Car Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारचा स्फोट घडवणारा दहशतवादी डॉ. उमर मोहम्मदचं पुलवामा येथील घर सुरक्षा दलाने आयईडीने उडवून दिलं आहे. दहशतवादविरोधी कारवाईचा भाग म्हणून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. नियंत्रित पद्धतीने डॉ. उमरचं हे घर IED ने उडवलं आहे.
दिल्ली स्फोटाच्या तपासात आतापर्यंत अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. गुरुवारी फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार सापडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही कार डॉ. शाहीन शाहिदच्या नावाने नोंदणीकृत आहे. शाहीनला आधीच 'व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल' प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
फरीदाबाद पोलिसांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलीस विद्यापीठात सापडलेल्या संशयास्पद मारुती ब्रेझा कारबाबत तपास करत आहेत. संशयास्पद कार सापडल्यानंतर, बॉम्ब पथकाला बोलावण्यात आले आणि वाहनाची तपासणी करण्यात आली. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या इतर वाहनांचीही तपासणी केली जात आहे. कारच्या मालकांची माहिती मिळवली जात आहे.
advertisement

मेसेजसाठी एन्क्रिप्टेड अॅपचा वापर

तपासात असं दिसून आलं की, स्फोटातील मुख्य आरोपी डॉ. उमर मोहम्मद, डॉ. मुझम्मिल अहमद आणि डॉ. शाहीन शाहिद यांनी एका एन्क्रिप्टेड स्विस मेसेजिंग अॅपद्वारे त्यांच्या दहशतवादी मोहिमेचे नियोजन आणि समन्वय केले होते. स्फोटस्थळावरून मिळालेल्या डीएनए नमुन्यांवरून पुष्टी झाली की डॉ. उमर लाल किल्ल्याजवळ स्फोट झालेल्या पांढऱ्या हुंडई आय२० कार चालवत होता.
advertisement

नुहमध्ये छापेमारी

गुरुवारी हरियाणातील नुह येथेही छापे टाकण्यात आले, जिथे पिनांगवा येथील एका खत आणि बियाणे विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने या दुकानातून मोठ्या प्रमाणात एनपीके खत खरेदी केल्याचा संशय आहे. शिवाय, बुधवारी फरिदाबादमधील खंडावली गावात तपास पथकाने मॉड्यूलची दुसरी कार - लाल फोर्ड इकोस्पोर्ट - जप्त केली.
ज्या माणसाने ही गाडी गावात पार्क केली होती त्याला फरीदाबाद पोलिसांनी अटक केली आणि दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले. तपासात असे दिसून आले की दहशतवाद्यांनी आयईडी वाहतूक करण्यासाठी तीन कार खरेदी केल्या होत्या. परिणामी, दिल्ली पोलिसांनी शहरातील सर्व पोलिस स्टेशन, चौक्या आणि सीमावर्ती ठिकाणी अलर्ट जारी केला.
view comments
मराठी बातम्या/देश/
दिल्ली स्फोटानंतर Crack Down सुरू, दहशतवादी उमरचं घर IED ने उडवलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement