Aadhaar Card : लहान मुलांचं आधार कार्ड कितीवेळा अपडेट करणं गरजेचं? अनेक पालकांना माहिती नाहीत हे महत्वाचे नियम

Last Updated:

Aadhaar Card Rules : आधार कार्ड वेळेवर अपडेट न केल्यास भविष्यात शैक्षणिक दस्तऐवज, प्रवेश प्रक्रिया किंवा सरकारी पडताळणी कामात अडथळे येऊ शकतात.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : लहान मुलांच्या ओळख दस्तऐवजांमध्ये आधार कार्ड हा सर्वात महत्त्वाचा कागदपत्रांपैकी एक मानला जातो. पण अनेक पालकांना हे माहितच नसतं की मुलांच्या आधार कार्डामध्ये वयाच्या दोन विशिष्ट टप्प्यांवर बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य आहे. वेळेवर अपडेट न केल्यास भविष्यात शैक्षणिक दस्तऐवज, प्रवेश प्रक्रिया किंवा सरकारी पडताळणी कामात अडथळे येऊ शकतात.
चला जाणून घेऊया लहान मुलांचे आधारकार्ड केव्हा केव्हा अपडेट करणं गरजेचं आहे आणि या कार्ड संदर्भात काही महत्वाची माहिती.
5 वर्षांच्या मुलांसाठी अपडेट का आवश्यक?
5 वर्षांपूर्वी मुलांचे आधार कार्ड त्यांच्या बायोमेट्रिकशिवाय बनते. म्हणजेच, फिंगरप्रिंट, डोळ्यांचे स्कॅन किंवा चेहऱ्याचा फोटो यात समाविष्ट नसतो.
मात्र, मुलगा/मुलगी 5 वर्षांचा झाल्यावर ही बायोमेट्रिक माहिती जोडणे आवश्यक असते. यालाच बाल आधार अपडेट किंवा Mandatory Biometric Update (MBU) म्हणतात.
advertisement
15 वर्षांनंतर दुसरे अपडेट का आवश्यक?
वय वाढल्यावर मुलांच्या शरीरात आणि चेहऱ्यात नैसर्गिक बदल होतात. त्यानुसार फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि चेहऱ्याची रचना बदलते.
म्हणूनच 15 वर्षांच्या वयात आधार कार्ड पुन्हा अपडेट करणे बंधनकारक आहे.
हे अपडेट न केल्यास पुढील गोष्टींमध्ये समस्या येऊ शकते -
शाळा–कॉलेज प्रवेश
स्पर्धा परीक्षा
ओळख पडताळणीची प्रक्रिया
फी लागते का?
मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही. UIDAI ने हे पूर्णपणे मोफत ठेवले आहे. म्हणून कोणालाही पैसे देऊ नका किंवा फसवणूक होऊ देऊ नका.
advertisement
बाल आधार अपडेट कसे करावे?
uidai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट बुक करा. ठरलेल्या दिवशी मुलासह जवळच्या आधार नामांकन केंद्रावर जा.
खालील कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक
जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र (योग्य असेल ते), पत्त्याचा पुरावा, पालकांचे आधार कार्ड. केंद्रावर मुलाचे फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन आणि फोटो घेतले जातील. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुलाचे आधार कार्ड वैध आणि अद्ययावत होईल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Aadhaar Card : लहान मुलांचं आधार कार्ड कितीवेळा अपडेट करणं गरजेचं? अनेक पालकांना माहिती नाहीत हे महत्वाचे नियम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement