IND vs SA 2nd Test : गंभीरच्या प्रयोगाचं भूत उतरलं! इकडं शुभमनला मिळाली वॉर्निंग, गुवाहाटी टेस्ट जिंकणार कशी?

Last Updated:

Shubman Gill Not Available For Guwahati Test : बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या 'करो या मरो' मॅचमध्ये शुभमन गिल खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

IND vs SA 2nd Test Shubman Gill
IND vs SA 2nd Test Shubman Gill
India vs South Africa 2nd Test : साऊथ अफ्रिकाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या म्हणजेच कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियाला दोन धक्के बसले. टीम इंडियाने सामना तर गमावलाच पण दुसरीकडे कॅप्टन शुभमन गिल देखील जायबंदी झालाय. शुभमन गिलच्या मानेला दुखापत झाल्याने आता गंभीरला त्याचे प्रयोग बंद करावे लागणार आहेत. अशातच भारतीय संघामध्ये टेन्शनचं वातावरण आहे. त्याला कारण शुभमन गिलविषयी डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट...

चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला

पीटीआय वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळे तो बुधवारी गुवाहाटीला जाणाऱ्या संघासोबत प्रवास करण्याची शक्यता नाही. बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या या दुसऱ्या 'करो या मरो' मॅचमध्ये तो खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये टेन्शनचं वातावरण आहे.
advertisement

बुधवारी अंतिम निर्णय?

शुभमनला मानेचा तीव्र त्रास आहे आणि दुखापतीबद्दल अधिक तपशील देण्याची आम्हाला परवानगी नाही. त्याला सतत मानेचा पट्टा घालावा लागेल, असं पीटीआयला सुत्रांनी सांगितलंय. परंतु, त्याच्या प्रगतीवर दररोज लक्ष ठेवलं जात आहे आणि मंगळवारपर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होईल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे बुधवारी टीम इंडियामध्ये मोठा निर्णय होईल, अशी शक्यता आहे.
advertisement

शुभमन नाही मग, टीम इंडियाचा कॅप्टन कोण?

शुभमन गिल जर गुवाहटी कसोटी खेळणार नसेल तर कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जात आहे. शुभमन गिलच्या जागी व्हाईस कॅप्टन ऋषभ पंत याच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र, कोलकाता कसोटीमध्ये ऋषभने केलेल्या चुका पाहता त्याला कॅप्टन्सी सोपवणं योग्य आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
advertisement

शुभमनच्या जागेवर कोण खेळणार?

जर शुभमन गिल मॅचमधून बाहेर झाला, तर संघात साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कलसारखे पर्याय उपलब्ध आहेत. साई सुदर्शनने वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीमध्ये 87 धावा केल्या होत्या. तसेच, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका 'ए' विरुद्धच्या चार डावांमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 32 होती. त्यामुळे दोघांपैकी संधी कुणाला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 2nd Test : गंभीरच्या प्रयोगाचं भूत उतरलं! इकडं शुभमनला मिळाली वॉर्निंग, गुवाहाटी टेस्ट जिंकणार कशी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement