3 मुलांच्या बापावर जडला जीव, त्याच्या बायकोला देऊ केले तीन कोटी, तरी त्या अभिनेत्याला नयनतारा आपलं करू शकलं नाही

Last Updated:
Nayanthara Affair : नयनताराने विघ्नेशबरोबर लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत. पण तुम्हाला माहिती आहे विघ्नेशबरोबर लग्नाआधी एका विवाहित अभिनेत्यावर नयनताराचं प्रेम होतं. त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तिने त्याच्या बायकोला पैसेही दिले होते.
1/9
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार नयनतारा तिच्या कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच तिने दिग्दर्शक-विघ्नेश शिवनशी लग्न केल. त्यानंतर ती  सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली.

advertisement
2/9
नयनतारा आणि विघ्नेश यांचं प्रेम नेहमीच ते सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का विघ्नेशशी लग्न होण्याआधी नयनतारा एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात होती. त्या अभिनेत्याला तीन मुलं होती.

3/9
त्या विवाहित अभिनेत्याशी लग्न करण्यासाठी नयनताराने अभिनेत्याच्या पत्नीला तब्बल 3 कोटी देऊ केले होते, असं म्हणतात. इतकं सगळं करुनही त्यांचं प्रेम पूर्ण होऊ शकलं नाही. पण त्यांच्या प्रेम कहाणीची आजही चर्चा होते.

4/9
अभिनेत्री नयनतारा आताच्या घडीला साऊथमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक आहे. तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त असून तिचे प्रत्येक सिनेमे ब्लॉकबस्टर होतात.

5/9
नयनताराचं विघ्नेशशी लग्न होण्याआधी ती अभिनेता आणि कोरिओग्राफ प्रभुदेवाच्या प्रेमात होती.  दोघांची अफेअर आजही चर्चेचा विषय आहे. नयनतारा आणि प्रभू लिव्ह इनमध्येही राहत होते. दोघांच्या लग्नाच्या चर्चाही रंगल्या होत्या.

6/9
नयनताराबरोबर अफेअर सुरू असताना प्रभू देवाचं लग्न झालं होतं. त्याना पत्नी आणि त्याची तीन मुलं होती. त्याचा सुखाचा संसार होता. त्यामुळेच नयनतारा आणि प्रभू देवाचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

7/9
2010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लता हिला दोघांच्या अफेअरबद्दल कळलं होतं. तिने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून प्रभुदेवा नयनतारासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर लताने प्रभुदेवाने नयनताराशी लग्न केले तर उपोषण करण्याची धमकीही दिली.

8/9
या सर्व घडामोडींमध्ये नयनतारा प्रभुदेवांवर इतकी प्रेम करत होती की तिने लताला फोन करून त्यांच्या लग्नासाठी परवानगी मागितल्याचंही बोललं जातं. नयनताराने लताला खुश करण्यासाठी 3 कोटी 85 लाखांचा हार भेट दिल्याची बातमी समोर आली होती.

9/9
या काळात प्रभुदेवा देखील सार्वजनिकरित्या नयनतारा त्यांच्यासाठी खास असल्याचं लागला होता. दोघे लग्न करणार अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या.  पण वाद, आरोप, कोर्ट केस आणि भावनिक तणावानंतर नयनतारा आणि प्रभु देवा वेगळे झाले. आज नयनतारा विघ्नेश शिवनसोबत आनंदी लग्नजीवन जगत आहे आणि दोन मुलांची आई असून आपल्या करिअरमध्येही यशस्वी आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement