advertisement

Marathwada Weather: उत्तर भारतातून येतंय संकट, मराठवाड्यात शेकोट्या पेटल्या, आज कुठं अलर्ट?

Last Updated:
Weather update: मराठवाड्यात थंडीची लाट निर्माण झाल्याची स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यांत पारा घसरला आहे.
1/5
राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या शीतहलरींचा जोर वाढल्याने मराठवाड्यात गारठा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तापमानात घट झाली आहे. त्यामुळे हाडं गोठवणारी थंडी जाणवत आहे. आज गुरुवारी, बहुतेक भागात कोरडे आणि थंड वातावरण कायम राहणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात हवामान कसं राहील? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीडमध्ये पारा चांगलाच घसरला आहे. आज कोरडं आणि थंड हवामान कायम राहील. आकाश पूर्णपणे स्वच्छ राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्याचेही कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

3/5
हिंगोली जिल्ह्यात निरभ्र आकाश राहणार आहे. तसेच येथील तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवडा भराच्या तुलनेत सध्या गारठा वाढला आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास थंडी जास्त जाणवत आहे.

4/5
उर्वरित नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पूर्ण दिवस कोरडे हवामान राहणार आहे. ढगांचे प्रमाण जवळजवळ शून्य असल्याने सकाळ-संध्याकाळच्या वेळेस थंडी अधिक तीव्रतेने जाणवेल. लातूर जिल्ह्यात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

5/5
आज मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाही. मात्र थंडीचा कडाका कायम असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement