IND vs SA : रवी शास्त्रींनी सुनावलं, पंतने लगेच स्ट्रॅटर्जी बदलली; वॉशिंग्टन सुंदरने फसवला सर्वात मोठा मासा! पाहा कसा?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Washington Sundar departs Temba Bavuma : साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन टेम्बाने मागील तिन्ही इनिंगमध्ये टीम इंडियाच्या नाकात दम केला होता. अशातच वॉशीने त्याला माघारी धाडलं आहे.
India vs South Africa 2nd Test : गुवाहाटी येथे सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचमध्ये आज, चौथ्या दिवशी पहिल्या तासाभराच्या खेळानंतर मॅच कूस बदलताना दिसत आहे. भारतीय टीमने एकामागून एक तीन विकेट्स घेऊन मॅचमध्ये जोरदार कमबॅक केलं. या प्रयत्नांमुळे दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग काहीशी डगमगल्याचं दिसलं. अशातच आता रवी शास्त्रींनी दिलेला सल्ला टीम इंडियाच्या कामी आला आहे.
टेम्बा बावुमाला जाळ्यात फसवलं
ऋषभ पंतने आज आपल्या रणनितीमध्ये बदल केला. ऋषभने वॉशिंग्टन सुंदरला लवकर बॉलिंग दिली. वॉशिंग्टन सुंदरने आपल्या बाउन्स आणि स्पिनच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा याला जाळ्यात फसवलं. साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन केवळ 3 धावांवर नितीश कुमार रेड्डीच्या हाती कॅच आऊट झाला. वॉशिंग्टनने पहिल्या दोन बॉलवर टेम्बाला खेळण्यास भाग पाडलं अन् तिसऱ्या बॉलवर त्याची विकेट काढली. टेम्बाने मागील तिन्ही इनिंगमध्ये टीम इंडियाच्या नाकात दम केला होता. अशातच वॉशीने त्याला माघारी धाडलं आहे.
advertisement
A timely strike for India as Sundar sends Bavuma back and lifts the energy on the field!
Momentum shifts again with South Africa three down!#INDvSA 2nd Test Day 4 LIVE NOW https://t.co/X0C19TxLAq pic.twitter.com/vH9Skwi46U
— Star Sports (@StarSportsIndia) November 25, 2025
advertisement
मॅचमध्ये विजयाची संधी
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडे सध्या 366 धावांची मोठी आघाडी असली तरी, आज मॅचचा चौथा दिवस असल्याने टीम इंडिया 400 धावांच्या आत दक्षिण आफ्रिकेला ऑल आऊट करण्यात यशस्वी झाल्यास भारतासाठी या मॅचमध्ये विजयाची संधी निर्माण होऊ शकते. आता टीम इंडियाला आपली बॅटिंग मजबूत करावी लागणार आहे.
advertisement
टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्कराम, रायन रिकल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (विकेटकीपर), सायमन हार्मर, केशव महाराज, मार्को जानसेन, सेनुरन मुथुसामी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : रवी शास्त्रींनी सुनावलं, पंतने लगेच स्ट्रॅटर्जी बदलली; वॉशिंग्टन सुंदरने फसवला सर्वात मोठा मासा! पाहा कसा?


