Journalist Death : जिथं करिअर घडवलं तिथंच आयुष्याचा अंत! प्रसिद्ध महिला पत्रकाराचा न्यूजरूममध्ये मृतदेह; 10 दिवसांनी होतं लग्न
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman Journalist Death : 23 नोव्हेंबर रोजी रविवारी ती एका मैत्रिणीच्या घरी प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती. मित्रांनी सांगितल्यानुसार त्या दिवशी ती खूप आनंदी दिसत होती.
advertisement
advertisement
5 डिसेंबर रोजी रितुमोनी आणि देबाशीष बोरा यांचं लग्न होणार होते. लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या गेल्या होत्या. लग्नाची सगळी तयारी झाली होती. 23 नोव्हेंबर रोजी रविवारी ती एका मैत्रिणीच्या घरी प्री-वेडिंग सेलिब्रेशनसाठी पोहोचली होती. मित्रांनी सांगितल्यानुसार त्या दिवशी ती खूप आनंदी दिसत होती. लग्नाचे फोटो शेअर करत होती. मात्र संध्याकाळी ती ऑफिसला गेली आणि त्यानंतर घरी परतलीच नाही.
advertisement
तिच्या होणारा नवरा देबाशीषने तिला फोन केला पण तिने फोन उचचला नाही. रात्रभर तिने फोन उचललाच नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी सकाळी ते स्वतः ऑफिसला पोहोचले, तेव्हा आतून दरवाजा बंद होता. दरवाजा जबरदस्तीने उघडण्याता आला तेव्हा रितुमोनी छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. शालीने गळफास लावला होता.
advertisement
मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. घटनास्थळावरून एक सुसाइड नोट मिळाली, ज्यात लिहिले होतं, "हे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. क्षमा करा." फॉरेन्सिक टीमने नोट लॅबमध्ये पाठवली आहे, जेणेकरून हस्ताक्षराची पुष्टी होऊ शकेल. प्राथमिक तपासात पोलिसांनी आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला.


