पोलिसाशी पंगा पडला महागात! 'त्या' रिक्षा चालकाला घडवली अद्दल, छत्रपती संभाजीनगरात का काढली धिंड?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar Crime : वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला रिक्षावर फरफटत नेणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीची धिंड काढत संपूर्ण परिसरात फिरवले.

+
‎वाहतूक

‎वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेणाऱ्या आरोपीची पोलिसांनी काढली धिंड.

‎छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जिथे शहरातील महावीर चौक म्हणजेच बाबा पेट्रोल पंप चौकात एका रिक्षा चालकाने कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारावर रिक्षा चढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. यात पोलीस अंमलदार तुकाराम टाकसाळे हे गंभीर जखमी झाले आणि त्यांच्यावर सध्या का खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेतील रिक्षा चालक आरोपी युसुफ मोहम्मद अन्सारी याला पोलिसांनी अटक करत त्याची शहरातील महावीर चौक ते रेल्वे स्थानक परिसरापर्यंत धिंड काढली. त्याचबरोबर त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची आहे. माहिती वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली आहे.
‎ रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाले आहे. साडेतीन महिन्यांपूर्वीही त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याची माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. 11 ऑगस्ट 2025 रोजी त्याने कामगार उपायुक्त कार्यालयातील एका शासकीय नोकरदार महिलेशी तिकीट (भाड्याच्या) पैशांवरून हुज्जत घातली होती. रेल्वेस्टेशन चौकात हा प्रकार घडला होता. त्या वेळी तेथे गेलेल्या वाहतूक पोलिसाशी त्याने हुज्जत घालत धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी त्याच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
advertisement
‎थेट पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर शहरात दिवसभर प्रत्येक चौकात शहर पोलिसांच्या पथकाने कठोर कारवाई सत्र राबवले. दिवसभरात एकूण 797 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 32 रिक्षा जप्त करण्यात आल्या, तर एकूण 9 लाख 66 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 3 लाख 67 हजार रुपयांचा दंड वसूलही करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात दिवसभर प्रत्येक चौकाला छावणीचे स्वरूप आले होते. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पोलिसाशी पंगा पडला महागात! 'त्या' रिक्षा चालकाला घडवली अद्दल, छत्रपती संभाजीनगरात का काढली धिंड?
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement