मोठी संधी! पूजापाठपासून ते आयुर्वेदापर्यंत,सगळीकडे या झाडाचा बोलबाला, लागवड करून कमवाल पैसाच पैसा

Last Updated:

Agriculture News : मोठी संधी! पूजापाठपासून ते आयुर्वेदापर्यंत सगळीकडे या झाडाचा बोलबाला, लागवड करून कमवाल पैसाच पैसा

agriculture news
agriculture news
मुंबई : सध्या कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या पिकांची मागणी वाढत आहे. अशा पिकांपैकी एक म्हणजे सिंदूर हे महत्त्वाचे मसाला व नैसर्गिक रंगद्रव्य देणारे झाड. औषधी गुणधर्म, नैसर्गिक रंगनिर्मिती आणि निर्यातक्षमतेमुळे सिंदूरची शेती आज शेतकऱ्यांसाठी लाखोंचे उत्पन्न देणारा लाभदायक व्यवसाय ठरत आहे.
सिंदूर म्हणजे काय?
सिंदूर (बिक्सा ओरेलाना) हे उष्ण कटिबंधीय झाड आहे. त्याच्या बोंडात लालसर दाणे असतात, ज्यापासून नैसर्गिक रंग ‘अनॅट्टो’ तयार होतो. हा रंग पूजापाठ, अन्नपदार्थ, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, साबण, तसेच औषध उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. रासायनिक रंगांना पर्याय म्हणून सिंदूरची मागणी जगभर वेगाने वाढत आहे.
कमी खर्च, जास्त नफा
एकदा लागवड केली की 20 ते 25 वर्षे उत्पादन या पिकातून उत्पादन मिळते. तसेच
advertisement
रोग कीड कमी येते. कोरडवाहू परिस्थितीतही त्याची उगवण क्षमता चांगली आहे. एका झाडापासून वर्षाला 2 ते 5 किलोपर्यंत बियां मिळतात. बाजारात 1 किलो सिंदूर बियांचा दर 250–400 रुपये इतका मिळू शकतो. त्यामुळे 200 ते 300 झाडांमधून वर्षाला लाखोंचे उत्पन्न शक्य आहे.
शेती कशी करावी?
हवामान आणि जमीन
सिंदूर वनस्पतीला उष्ण व दमट हवामान अनुकूल आहे. हलकी ते मध्यम काळी जमीन, वालुकामय जमीन उत्तम. पाण्याचा निचरा योग्य असावा.
advertisement
लागवड कधी करावी?
जून–जुलै महिन्यात रोपांची लागवड सर्वोत्तम. रोपे नर्सरीत तयार करून ३ ते ४ फूट उंच झाल्यावर लावली जातात.
लागवड अंतर
प्रति झाड 3×3 किंवा 4×4 मीटर अंतर ठेवल्यास उत्पादन चांगले मिळते. एका एकरात 250 ते 300 झाडे सहज बसतात.
पाणी व्यवस्थापन
पहिल्या वर्षी 8–10 दिवसांनी पाणी द्यावे. त्यानंतर झाडे स्थिर झाली की कमी पाण्यातही वाढ चांगली होते.
advertisement
खत व्यवस्थापन
कमी खतांमध्येही उत्पादन चांगले मिळते. गोमूत्र, शेणखत आणि कंपोस्टचा वापर अधिक फायदेशीर.
सिंदूरपासून किती कमाई होते?
एक झाड सरासरी 3 किलो बिया देते असे गृहित धरल्यास 1 किलो दरचा 300 रुपये
एका झाडाचे उत्पन्न 900 रुपये तर 250 झाडांचे वार्षिक उत्पन्न 2,25,000 रुपये
300 झाडांचे उत्पन्न 2,70,000 ते 3,00,000 रुपये उत्पन्न मिळते.
advertisement
याशिवाय सिंदूर बियापासून नैसर्गिक रंग, पेस्ट, तेल तयार करून विकल्यास नफा दुप्पट ते तिप्पट वाढतो. निर्यातक्षम असल्याने एकदा मार्केट मिळाले की वर्षाला 5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे.
एकूणच काय तर कमी मेहनत,कमी गुंतवणूक आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारे पीक म्हणून सिंदूरची शेती शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. योग्य नियोजन, रोप व्यवस्थापन व बाजारपेठेशी संपर्क ठेवल्यास ग्रामीण भागातील शेतकरीही सिंदूरच्या माध्यमातून दरवर्षी लाखोंची कमाई करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मोठी संधी! पूजापाठपासून ते आयुर्वेदापर्यंत,सगळीकडे या झाडाचा बोलबाला, लागवड करून कमवाल पैसाच पैसा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement