Kiran Mane News: "दु:खातून सावरल्या नाही, तोच राजकारणाच्या जुल्मी सारीपाटावर स्वत:ला..." सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यावर अभिनेत्याची पोस्ट
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'बिग बॉस मराठी 4' फेम अभिनेता किरण माने यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनंदन करणारी फेसबूक पोस्ट शेअर केली.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोणाकडे जाणार? याची सर्वत्र चर्चा होती. अखेर आज (शनिवार- 31 जानेवारी) राज्याला दुसरे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शप्पथ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतल्यानंतर राज्यातल्या अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यासोबतच आता काही मराठी सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहित त्यांचे अभिनंदन करत आहे.
मराठमोळा अभिनेता आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले आहे.
किरण मानेंची जशीच्या तशी पोस्ट
...सगळा महाराष्ट्र राजकारणाचा क्रूर, हिंस्त्र आणि निर्दयी खेळ बघतोय. अर्थात हा काळ यावाच लागतो. महाराष्ट्रातल्या बहुजनांना ही नीच विचारसरणी समजून त्यांचे डोळे उघडेपर्यंत याहून अनेक खुनशी, रक्तरंजीत घटनांचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे. असो.
advertisement
...सुनेत्रावहिनींनी आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना मी जेवढे पाहिले आहे तेवढ्या प्रसंगात अतिशय संवेदनशील, मायाळू आणि पर्यावरणावर प्रेम असलेलं व्यक्तीमत्त्व मला दिसलं.
तीन वर्षांपुर्वी त्यांनी स्वत: फोन करून मला त्यांच्या एनव्हायरलमेन्टल फोरमच्या वर्धापनदिनादिवशी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलं होतं. त्याआधी मला अजितदादांच्या पत्नी याव्यतिरीक्त एक व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल फारशी ओळख नव्हती.
advertisement
...तिथं गेल्यावर मला समजलं की सुनेत्रा वहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातनं पर्यावरण विषयक जागृतीचं अफाट काम केलंय! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण पाहिलं मी.
advertisement
कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहुन मी अक्षरश: थक्क झालो!
पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदुषण, प्राणी- पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतलेले दिसुन आले. हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही त्या भरवतात हे समजले. आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम त्या करतात हे पाहून भारावून गेलो.
advertisement
आज त्या दु:खातून सावरल्याही नाहीत, तोवर त्यांना या राजकारणाच्या जुल्मी सारीपाटावर स्वत:ला उभं करावं लागलं. अर्थात यामागचं गूढ राजकारण न समजण्याइतक्या त्या कमकुवत नाहीत. ‘जवळचे आणि दूरचे’ ओळखून त्या या सगळ्याला समर्थपणे तोंड देतील हा विश्वास आहे. उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक नाही, त्यामुळे मिडीयानं पसरवलेलं 'पहिल्या महिला उपमुख्यमंत्री' वगैरे बिरूद मला फार महत्त्वाचं वाटत नाही. त्याहून जास्त पतीच्या निधनाचं दु:ख बाजूला ठेवून त्यांची अपुर्ण स्वप्नं पुर्ण करण्यासाठी काटेरी सिंहासन निवडणारी खंबीर भगिनी म्हणून त्यांचा अभिमान आहे.
advertisement
अभिनंदन सुनेत्राताई...
अशी पोस्ट किरण माने यांनी फेसबूकवर शेअर केली आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 9:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kiran Mane News: "दु:खातून सावरल्या नाही, तोच राजकारणाच्या जुल्मी सारीपाटावर स्वत:ला..." सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यावर अभिनेत्याची पोस्ट









