PAK vs AUS : 'तो बॉल फेकतोय...', कॅमरून ग्रीन संतापला, पाकिस्तानी बॉलरच्या ऍक्शनवरून मैदानात राडा, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनने पाकिस्तानी बॉलर उस्मान तारिकच्या बॉलिंग ऍक्शनवर आक्षेप घेतला.
लाहोर : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लाहोरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनने पाकिस्तानी बॉलर उस्मान तारिकच्या बॉलिंग ऍक्शनवर आक्षेप घेतला. मागच्या बऱ्याच काळापासून उस्मान तारिकच्या बॉलिंग ऍक्शनवर संशय घेण्यात येत आहे. उस्मान तारिक हा बॉल फेकत असल्याच्या बऱ्याच प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या होत्या, पण एखाद्या क्रिकेटपटूकडून पहिल्यांदाच उस्मान तारिकच्या बॉलिंगवर अशाप्रकारे संशय घेण्यात आला आहे.
कॅमरून ग्रीन दुसऱ्या टी-20 सामन्यात उस्मान तारिकच्या बॉलिंगवर नाराज दिसत होता, तसंच तो बॉल फेकत असल्याचं ग्रीन म्हणाला. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू असताना 11 व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर उस्मान तारिक बॉल टाकण्यासाठी आला, तेव्हा तो अचानक थांबला आणि त्याने पुन्हा बॉल टाकला. उस्मान तारिक बॉल टाकताना थांबल्यामुळे कॅमरून ग्रीन गोंधळला आणि स्वत:ची विकेट गमावून बसला. आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना ग्रीनने उस्मान तारिक बॉल फेकत असल्याची ऍक्शन केली, याचा व्हिडिओही आता समोर आला आहे.
advertisement
Cameron Green crying over the bowling action of Usman Tariq.
- The so called most expensive player of IPL.
pic.twitter.com/1B3vdMmxSU
— Salman. (@TsMeSalman) January 31, 2026
ऑस्ट्रेलियाचा पराभव
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 90 रननी पराभव झाला आहे. याचसोबत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची ही सीरिजही 2-0 ने गमावली आहे. पाकिस्तानने दिलेलं 199 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा 15.4 ओव्हरमध्ये फक्त 108 रनवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून ग्रीनने 20 बॉलमध्ये सर्वाधिक 35 रन केले. तर मॅथ्यू शॉर्टने 27 आणि कर्णधार मिचेल मार्शने 18 रनची खेळी केली. पाकिस्तानकडून अबरार अहमद आणि शादाब खान यांनी 3-3 विकेट घेतल्या. याशिवाय उस्मान तारिकला 2, सॅम अयुबला 1 आणि मोहम्मद नवाजला 1 विकेट मिळाली.
advertisement
पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 198 रन केल्या. कर्णधार सलमान आघाने सर्वाधिक 76 रन केले, याशिवाय उस्मान खानने 53, शादाब खानने नाबाद 28 आणि सॅम अयुबने 23 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट, मॅथ्यू कुन्हेमन, कुपर कॉनली, सीन अबॉट आणि एडम झम्पा यांना 1-1 विकेट मिळाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 9:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs AUS : 'तो बॉल फेकतोय...', कॅमरून ग्रीन संतापला, पाकिस्तानी बॉलरच्या ऍक्शनवरून मैदानात राडा, Video










