Bigg Boss 19 चा लेटेस्ट व्होटिंग ट्रेंड समोर, हा स्पर्धक कोरणार ट्रॉफीवर नाव?

Last Updated:

Bigg Boss 19 Voting Trend : 'बिग बॉस 19'चा फिनालेआधी संपूर्ण गेम बदलला आहे. नुकतंच लेटेस्ट वोटिंग ट्रेंड समोर आले आहेत.

News18
News18
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा बहुचर्चित कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला असून गेम अधिकच रोमांचक होत चालला आहे. फिनालेला फक्त 2 आठवडे बाकी असताना चाहत्यांनी आपल्या फेव्हरेट स्पर्धकासाठी भरभरून वोट्स करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर कोणता स्पर्धक सध्या आघाडीवर आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा हा कार्यक्रम 24 ऑक्टोबरला सुरू झाला होता. अभिषेक बजाज आणि नीलम-मृदुल तिवारी यांच्या बाहेर पडण्यानंतर आता 9 स्पर्धक फिनालेसाठी लढत आहेत. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला जिंकवण्यासाठी सातत्याने मोठ्या प्रमाणात मतदान करत आहेत. जिओ हॉटस्टारवर मतदानाचा सिलसिला सुरूच आहे, पण त्याचबरोबर चाहते सोशल मीडियावरही मतदान करून कोण शो जिंकायला हवा याविषयी आपली पसंती दर्शवत आहेत.
वोटिंग ट्रेंड काय सांगतोय?
सोशल मीडियावरील मतदान यादीत सर्वात खालच्या स्थानावर कोण आहे, म्हणजे ज्याला कमीत कमी मतं मिळत आहेत, हे तर समोर आलेच आहे. मात्र फिनालेला 2 आठवडे बाकी असताना कोण सर्वात टॉपवर आहे जाणून घ्या. 'बिग बॉस 19'च्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार, सध्या ज्याचा गेम लोकांना सर्वाधिक आवडत आहे आणि ज्याला सर्वाधिक मतं मिळत आहेत, तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे. प्रणितला तब्बल 23,392 (30%) मतं मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गौरव खन्ना असून त्याला 20,444 (26%) मतं मिळाली आहेत. तिसऱ्या स्थानावर फरहाना भट, तर चौथ्या स्थानावर अशनूर आहे.
advertisement
प्रणित मोरेला पाठिंबा
प्रणित मोरे 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री केल्यानंतर अंडरडॉग म्हणून खेळत होता. पण हळूहळू त्याची भूमिका घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांनाही खूप लॉजिकल वाटू लागली. तो परत आल्यानंतरच्या आठवड्यात त्याने सलमान खानकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून आपल्या प्रतिस्पर्धी अभिषेक कुमारला थेट शोमधून बाहेर काढले. यानंतर गौरव खन्नाला ‘आपला’ म्हणून संबोधणाऱ्या प्रणितने गेल्या आठवड्यात होस्ट रोहित शेट्टी यांच्या समोर त्यांनाच धोका देत शहबाज खानचा गेम चांगला असल्याचे सांगितले. यानंतर या दोघांमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळाला. मराठमोळ्या प्रणित मोरेला सोशल मीडियावर चांगला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस 19'च्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 चा लेटेस्ट व्होटिंग ट्रेंड समोर, हा स्पर्धक कोरणार ट्रॉफीवर नाव?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement