Winter Interesting Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर बाथरूमबाहेर पडताना थंडी का वाजते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cold after Bath : हिवाळ्यात गरम गरम पाण्याने अंघोळ करताना चांगलं वाटतं, पण गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतरही बाथरूममधून बाहेर आल्यावर थंडी का लागते?
advertisement
गरम पाण्याने अंघोळ केल्यावर त्वचेखालील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, याला वेसोडायलेशन म्हणतात. यामुळे शरीरातील उष्णता त्वचेच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात येते. या प्रक्रियेदरम्यान आपल्याला खूप गरम वाटतं. पण अंघोळ झाल्यावर गरम वातावरणापासून थंड वातावरणात गेल्यावर ही उष्णता जलद गतीने बाहेर जाऊ लागते. यामुळे शरीराचा तापमान-संतुलन बिघडतं आणि त्वचेला अचानक थंडी जाणवायला लागते.
advertisement
advertisement
advertisement


