advertisement

Pune Crime: पुणे हादरलं! रिक्षा वळवण्यावरून वाद, कोंढव्यात चौघांचा रिक्षाचालकावर रस्त्यातच गोळीबार

Last Updated:

केवळ रिक्षा वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर एका भीषण हिंसक घटनेत झाले आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका रिक्षा चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रिक्षाचालकावर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
रिक्षाचालकावर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रिक्षा चालवताना केवळ रिक्षा वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर एका भीषण हिंसक घटनेत झाले आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका रिक्षा चालकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयित आरोपींना अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
रिक्षा चालक इब्राहिम उर्फ अज्जू अहमद शेख (वय ४८) हे ८ मार्चच्या मध्यरात्री कोंढव्यातील काकडे वस्ती परिसरातून जात होते. महापालिकेच्या क्रीडांगणाजवळ रिक्षा वळवत असताना समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराशी त्यांचा वाद झाला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपींनी कुणाल जाधव, आदित्य घावरे आणि त्यांच्या साथीदारांनी शेख यांच्यावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून थेट गोळीबार केला. एवढेच नव्हे, तर त्यांना तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांची तत्परता
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कुणाल उर्फ नन्या जाधव, आदित्य घावरे, अक्षय जावळे आणि शिवाजी मरगळे या चौघांना शिताफीने बेड्या ठोकल्या. या टोळक्यातील इतर साथीदारांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. भररस्त्यात पिस्तूल काढून गोळीबार करण्यापर्यंतची मजल या गुन्हेगारांनी गाठल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुणे हादरलं! रिक्षा वळवण्यावरून वाद, कोंढव्यात चौघांचा रिक्षाचालकावर रस्त्यातच गोळीबार
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement