Pune Crime : पुणे स्टेशनवर ओळख, तिला घरी आणलं अन् बाप-लेकाचं भयानक कांड, शहर हादरलं!
Last Updated:
Yerawada Crime News : येरवडा येथून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे एक पिता-पुत्राने महिलेचा खून करुन तिचा मृतदेह कचरा-पेटीत फेकून दिलेला आहे.
पुणे : पुण्यात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात पुन्हा एकदा पुण्याच्या येरवडा परिसरातून अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. जिथे एका 40 वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेत धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्या केल्यानंतर तब्बल दोन ते तीन दिवस आरोपींनी महिलेचा मृतदेह घरात लपवून ठेवला आणि जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा मृतदेह कचरापेटीत फेकून सर्व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
महिलेच्या हत्येमागील नेमकं गूढ काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सुवर्णा वय अंदाजे 40 असे असून ही फिरस्ती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या तिजे पूर्ण नाव अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेप्रकरणी येरवडा पोलिसांनी एका वडील आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दिलेली आहे.
advertisement
महिलेचा अन् आरोंपीची ओळख कशी काय?
आरोपी तरुण आणि मृत महिला यांची काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन परिसरात ओळख झाली होती. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी त्याने तिला आपल्या येरवडा येथील घरात बोलावले होते. महिला घरी आल्यानंतर त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादही झाले होते. धक्कादायक म्हणजे या वादात तरुणाच्या वडिलांनीही हस्तक्षेप केला होता त्यामुळे हा वाद वाढस आणि दोघांनीही रागाच्या भरात घरातच महिलेला लाकडी दांडक्याने वार केले.
advertisement
वडील आणि पोराने केलेल्या मारहाणीत महिला रक्ताच्या थारोळ्यात जखमी होऊन जागीच कोसळली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. दोघांकडून झालेला गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी तिचा मृतदेह घरातच लपवून ठेवला. पण काही दिवसांनी मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने दोघांनी तो लोहगाव-वाघोली रोडवरील कचरापेटीत फेकून दिला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा संपूर्ण प्रकार उघड झाला असून आरोपींनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुणे स्टेशनवर ओळख, तिला घरी आणलं अन् बाप-लेकाचं भयानक कांड, शहर हादरलं!


