Amitabh Bachchan Film : गावाची अजबच परंपरा! बाळ जन्माला येताच दाखवतात बिग बींच्या फिल्म, कारण काय?

Last Updated:
Amitabh Bachchan : अभिनेते अमिताभ बच्चन यांचे चाहते जगभरात आहेत. पण देशात असं एक गाव आहे जिथे बाळ जन्माला आल्यानंतर संपूर्ण गावाला बिग बींचा सिनेमा दाखवण्याची प्रथा आहे.
1/8
घरात नवीन बाळ जन्माला आलं की त्याला देवाच्या दर्शनाला नेलं जातं. गावभर पेढे वाटले जातात, पार्टी केली जाते.  पण भारतात असं एक गाव आहे जिथे बाळ जन्माला आलं की थेट बिग बींचा सिनेमा दाखवला जातो. गेली अनेक वर्ष ही परंपरा या गावात सुरू आहे.

advertisement
2/8
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जयदीप अहलावत याने नुकताच हा किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून बिग बी अमिताभ बच्चनही भावुक झाले.

3/8
अभिनेता जयदीप अहलावत नुकताच कौन बनेगा करोडपतीमध्ये आला होता.  अमिताभ बच्चन लाखो चाहत्यांचे आदर्श आहेत. अभिनेता जयदीप अहलावत देखील त्यांच्यातील एक आहे. लहानपणापासून जयदीपनं बिग बींचे सिनेमे पाहिले आहेत.

4/8
  जयदीपने सांगितलं की, त्यांच्या गावात नवजात बाळ जन्माला आलं की साजरा होणारा आनंद बच्चन यांच्या क्लासिक चित्रपटांशिवाय पूर्णच होत नाही.

5/8
जयदीप अहलावतने सांगितलं,
जयदीप अहलावतने सांगितलं, "लहानपणी आमच्या गावात जेव्हा एखादं मूल जन्माला यायचं तेव् तो आनंद साजरा करण्यासाठी नेहमी बच्चन साहेबांचे चित्रपट लावले जायचे. दीवार, जंजीर आणि डॉन हे चित्रपट मी या परंपरेमुळे शंभराहून अधिक वेळा पाहिले आहेत."
advertisement
6/8
जयदीप अहलावतने पुढे सांगितलं,
जयदीप अहलावतने पुढे सांगितलं, "शोलेचा ऑडिओ आमच्या सगळ्या सणांचा मुख्य भाग होता. होळी, दिवाळी किंवा कोणताही मोठा सण असो… पूर्ण गाव त्या साउंडट्रॅकला कान लावून बसायचं. डायलॉग, सीन, पार्श्वसंगीत सगळं पुन्हा पुन्हा ऐकण्यात एक वेगळीच मजा होती." जयदीप अहलावतने सांगितलेली गावातील ही प्रथा ऐकून बिग बी अमिताभ बच्चनही भावुक झाले.
advertisement
7/8
अभिनेते जयदीप अहलावतचा जन्म हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहम चौबिसी तहसीलमधील खारकारा या गावात झाला. याच गावात ही प्रथा फॉलो केली जाते. नवजात बाळ जन्माला आलं की गावात बिग बींचे सिनेमे दाखवले जातात.

8/8
जयदीप अहलावतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्याचा 'द फॅमिली मॅन 3' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात जयदीप अहलावतबरोबर अभिनेते मनोज बाजपेयी, शारिब हाशमी देखील प्रमुख भुमिकेत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement