Recipe Video : शेपूची भाजी माहिती असेल कधी खाल्लीत का शेपूची फळं; आवडत नसली तरी आवडीने खाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shepuchi Fala Recipe Video : शेपूची सामान्यपणे भाजी केली जाते, जशी इतर पालेभाजी करतात तशीच. तुम्हीही कधीतरी शेपूची भाजी खाल्ली असल पण तुम्ही कधी शेपूची फळं ट्राय केली आहेत का?
शेपू म्हणताच अनेकांच्या डोक्याला आट्या पडल्या असतील. बहुतेक लोक आहेत ज्यांना एकतर पालेभाजी आवडत नाही त्यातही शेपू म्हटलं की नकोच. कारण त्याचा वेगळाच वास येतो. तर काही जण मात्र शेपू आवडीने खातात. शेपूची सामान्यपणे भाजी केली जाते, जशी इतर पालेभाजी करतात तशीच. तुम्हीही कधीतरी शेपूची भाजी खाल्ली असल पण तुम्ही कधी शेपूची फळं ट्राय केली आहेत का?
शेपूची फळं एक स्थानिक पारंपारिक पदार्थ. त्यामुळे काही लोकांना हा माहिती असेल तर काहींना नाही. शेपूची फळं म्हणजे काय? ती कशी बनवायची? त्यासाठी काय काय साहित्य लागतं? संपूर्ण माहिती आणि कृती आम्ही तुम्हाला इथं देत आहोत.
शेपूची फळं करण्यासाठी साहित्य
शेपूची एक जुडी निवडून धुवून बारीक चिरून घ्या
अडीच वाट्या गव्हाचं पीठ
advertisement
चवीनुसार मीठ
पाव चमचा ओवा
पाव चमचा जिरं
पाव चमचा हळद
पाव चमचा मोहरी
पाव चमचा जिरं
पाव चमचा हिंग
कढीपत्ता
एक टीस्पून बारीक चिरलेला लसूण
एक चमचा लाल तिखट किंवा तुमचा कोणताही घरगुती मसालाट
advertisement
बारीक चिरलेली कोथिंबीर
शेपूची फळं कशी बनवायची?
एका परातीत गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला शेपू, ओला, जिरं, हळद सर्व साहित्य एकत्र करून घ्या. थोडं थोडं पाणी घालून पीठ मिळून घ्या. थूप घट्ट किंवा पातळही नाही. नीट मळलं ती तेल लावून घ्या. त्याचे गोळे करा आणि हाताला तेल लावून चपट्या करून घ्या. त्याला तेल लावून घ्या. म्हणजे उकडताना ते चिकटणार नाही. स्टिमर, स्टिमर नसेल तर कढईत पाणी ठेवून त्याच्यावर चाळणीला तेल लावून त्यात हे शेपूचे केलेल चपटे गोळे म्हणजे फळं ठेवायचे आणि 15-20 मिनिटं वाफवून घ्या. हात लावून बघा. हाताला चिकट लागत नसतील तर ती नीट शिजली.
advertisement
एका प्लेटमध्ये काढून घ्या. तुम्ही यावर कढी टाकून खाऊ शकता किंवा यावर फोडणी टाकून खाऊ शकता. फोडणीसाठी एका कढईत तेल घ्या. त्यात पाव चमचा मोहरी घाला, मोहरी तडतडली की पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, एक टीस्पून बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. आता यात शेपूची फळं टाकून 2-3 मिनिटं मिक्स करा. झाकण ठेवून 2-3 मिनिटं वाफ द्या म्हणजे फोडणी आत मुरेल. आता एक-दोन टीप्सून भाजलेला दाण्याचा जाडसर कूट टाकून परतून घ्या.
advertisement
नाश्त्याला किंवा साइड डिश म्हणून खाऊ शकता. नाश्त्याला तुम्ही दद्यासोबत किंवा कढीसोबत खाऊ शकता. युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही शेपूची फळं कधी खाल्ली आहेत का? तुम्हाला कशी वाटली? कशी लागली? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही शेपूची अशी काही वेगळी रेसिपी बनवत असला तर तीसुद्धा आमच्यासोबत नक्की शेअर करा.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 20, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Recipe Video : शेपूची भाजी माहिती असेल कधी खाल्लीत का शेपूची फळं; आवडत नसली तरी आवडीने खाल


