advertisement

बीड हादरलं! ग्रामपंचायत कार्यालयातच 'लक्ष्मी' दर्शन; ग्रामरोजगार सेवकाचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Last Updated:

सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते, याचे विदारक चित्र चव्हाट्यावर आले आहे.

News18
News18
बीड : ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असताना, स्थानिक स्तरावर मात्र भ्रष्टाचार सुरू असल्याचे समोर आले आहे. माजलगाव तालुक्यातील वाघोरा येथील ग्रामरोजगार सेवकाने शेतकऱ्याकडून उघडपणे पैसे स्वीकारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. फळबाग लागवडीचे मस्टर काढण्यासाठी या सेवकाने पैशांची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्याने केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, वाघोरा गावचे ग्रामरोजगार सेवक शुभम माने यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये माने हे चक्क ग्रामपंचायत कार्यालयात आपल्या खुर्चीवर बसून एका व्यक्तीकडून काही पैसे स्वीकारताना स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते, याचे विदारक चित्र चव्हाट्यावर आले आहे.
advertisement

सेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी

याप्रकरणी कोंडीबा लोंढे या पीडित शेतकऱ्याने माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) लेखी तक्रार दाखल केली आहे. लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या फळबाग लागवडीचे मस्टर काढण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाने पैशांची मागणी केली होती. हतबल होऊन पैसे देताना त्यांनी हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. आता या व्हिडिओ पुराव्यासह त्यांनी संबंधित सेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
advertisement

निलंबनाची कारवाई करणार का?

ग्रामीण भागात 'मनरेगा' सारख्या योजनांमधून मजुरी आणि अनुदान मिळवण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, याच पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. आता या व्हायरल व्हिडिओची दखल घेऊन पंचायत समिती प्रशासन शुभम माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीड हादरलं! ग्रामपंचायत कार्यालयातच 'लक्ष्मी' दर्शन; ग्रामरोजगार सेवकाचा लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement