Dink Gond Recipe Video : डिकांचे लाडू नेहमीच खाता, या थंडीत ट्राय करा डिंकाचा चहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dink Tea Recipe Video : हिवाळा म्हणजे डिंक आलाच. थंडीत डिंकाचे लाडू आवर्जून केले जातात. डिंकाची खीरही बनवतात. पण डिंकाचे लाडू, खीर हे तर आपण नेहमीत खात आलो आहोत. पण तुम्ही कधी डिंकाचा चहा प्यायला आहात का?
आता थंडी सुरू झाली आहे. थंडी म्हणजे मेथी आणि डिंकाचे लाडू आलेत. किंबहुना डिंक म्हटलं की समोर येतात ते डिंकाचे लाडूच. हिवाळ्यात डिंकाचे लाडू आवर्जून केले जातात. गरोदर महिलांनाही डिकांचे लाडू आवर्जून खायला दिले जातात. डिंकाची खीरही बनवतात. पण डिंकाचे लाडू, खीर हे तर आपण नेहमीत खात आलो आहोत. पण तुम्ही कधी डिंकाचा चहा प्यायला आहात का?
डिंक म्हणजे झाडाच्या खोडातून स्रवणारा चीक. हा चिक पिवळसर पांढऱ्या रंगाचा आणि खड्यासारखा असतो. सोप्या आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर झाडाला जेव्हा एखादी जखम होते तेव्हा, जखमी भागाचं संसर्गापासून रक्षण करण्यासाठी झाड जो द्रव स्रवतो तो द्रव म्हणजे चिक. सगळी झाडं असा चिक किंवा डिंक स्रवत जरी असले तरीही आपण काही ठराविक झाडांच्या डिंकाचा वापर आहारात करतो.
advertisement
डिकांचे फायदे
डिंक हे उष्ण प्रकृतीचं असल्याने हिवाळ्यात खाणं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरासाठी अतिरिक्त ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करतं. त्यामुळे जर कोणत्या कारणामुळे तुम्हाला थकवा किंवा अंगदुखी जाणवत असले तर डिंकाचे लाडू खाल्ल्याने तो त्रास दूर होईल. श्रमाचं काम करणाऱ्या व्यक्तींसह गर्भवती महिलांनी डिंक खाल्ल्यास त्यांचा गर्भारपणातला थकवा दूर होऊ शकतो.
advertisement
डिंकातल्या पोषक तत्त्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासोबतच हाडांचा ठिसूळपणा दूर व्हायला मदत होते.
डिंकात प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. फायबर्समुळे अन्न पचायला मदत होतं. त्यामुळे हिवाळ्यात अनेकांना जो अपचानाचा त्रास होतो तो त्रास डिंकामुळे दूर होऊ शकतो. याशिवाय पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेच्या आजारावरही डिंक गुणकारी ठरू शकतात.
advertisement
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यात डिंकाचे लाडू महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे चयापचयक्रिया वाढण्यासोबत यकृताचं आरोग्य सुधारायला मदत होते.डिंकामध्ये चांगले फॅटस असतात. त्यामुळे रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होऊन रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे हृदयविकारच्या समस्यांना दूर ठेवता येतं.
शरीराच्या अंतर्गत महत्त्वाच्या अवयवांसाठी जसं डिंक महत्त्वाचं आहे तसंच ते सौंदर्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो. मात्र डिंक खाल्ल्याने त्वचा हायड्रेड राहायला मदत होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.
advertisement
डिंकाचा चहा
सामान्यपणे डिंक खायचा म्हटलं की डिंकाचे लाडू आणि खीर त्यामुळे डिंकाचा चहा वाचूनच तुम्हाला अजब वाटलं असेल. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी डिकांच्या चहा कसा बनवायचा हे दाखवलं आहे. युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
advertisement
डिकांचा चहा बनवण्याची कृती फार वेगळी किंवा किचकट नाही आहे. अगदी आपण आपला रोजचा चहा बनवतो तशीच आहे. यासाठी एक कप दूध, त्यात चहा पावडर, डिंक पावडर, आलं टाकून उकळून घ्या. चहा तयार. तो गाळून घ्या.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 19, 2025 10:11 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dink Gond Recipe Video : डिकांचे लाडू नेहमीच खाता, या थंडीत ट्राय करा डिंकाचा चहा


