खूप गरिबीत दिवस काढले! आज 20 नोव्हेंबरपासून महालक्ष्मी राजयोग, या 4 राशींकडे पैसा येण्यास सुरुवात होणार

Last Updated:
Astrology News : माणसाच्या जीवनात सुख-दुःख ही नैसर्गिक चढउताराचीच प्रक्रिया असते. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहता, ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो.
1/5
astrology news
माणसाच्या जीवनात सुख-दुःख ही नैसर्गिक चढउताराचीच प्रक्रिया असते. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहता, ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यानुसार, येत्या 20 नोव्हेंबरपासून मंगळ-चंद्र युतीमुळे ‘महालक्ष्मी राजयोग’ नावाचा एक दुर्मिळ आणि प्रभावी योग निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी मार्गशीर्ष महिना सुरू होत असल्याने हा काळ अधिक शुभ मानला जात आहे. ज्योतिषांच्या मते, हा योग सर्व राशींना फायदेशीर ठरेल, मात्र चार राशींना विशेष लाभ मिळणार आहे.
advertisement
2/5
मेष
मेष -  मंगळ आणि चंद्राची युती मेष राशीवाल्यांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. करिअरमध्ये मोठी वाढ, पदोन्नती आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे. आर्थिक लाभ वाढतील आणि आत्मविश्वासात वाढ होईल. तुमचे धाडसी निर्णय मोठे यश देऊ शकतात.
advertisement
3/5
कर्क
कर्क -  कर्क राशीसाठी हा काळ करिअर आणि आर्थिक वाढीचा आहे. नोकरी अथवा व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, आरोग्य सुधारेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
4/5
वृश्चिक
वृश्चिक -  या युतीचा सर्वात मजबूत प्रभाव वृश्चिक राशीवर होणार आहे. आरोग्य, संपत्ती आणि यश तीनही क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील. मोठा आर्थिक लाभ किंवा नवा आर्थिक स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल, आत्मविश्वास सुधारेल आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. करिअरमध्ये स्थिरता येईल.
advertisement
5/5
मकर
मकर - मकर राशीवाल्यांसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. नशिबाचा मजबूत साथ लाभेल. लांब पल्ल्याच्या प्रवासाला शुभफळ मिळेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. परदेशात जाण्याच्या किंवा परदेशातून लाभ मिळण्याच्या संधी तयार होऊ शकतात. वडील किंवा वरिष्ठांकडून विशेष मदत मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement