नागपुरातील ICICI बँकेत गोल्ड लोन घोटाळा उघड! बनावट दागिने ठेवून 23 कोटींचं कर्ज घेतलं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gold Loan Scam: आयसीआयसीआय बँकेत गोल्ड लोन स्कॅम झाल्याची माहिती आहे. यात काही लोकांनी चक्क बनावट सोनं गहाण ठेवून कर्ज घेतल्याची माहिती आहे.
उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर : नागपुरातील ICICi बँकेत 23 कोटी रुपयांचा गोल्ड लोन घोटाळा समोर आलाय. चकीत करणारी गोष्ट म्हणजे यामध्ये काही लोकांनी नकली सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज घेतलं होतं. यामध्ये 195 अकाउंटधारकांनी बनावट सोन्याचे दागिणे तारण ठेवलं आणि कर्ज उचलल्याची माहिती आहे. पण या सोन्यावर लोन मिळालंच कसं असा प्रश्न उपस्थित होतो.
सोन्याचं मूल्यांकन करणाऱ्या व्हॅल्यूअर, ऑडिटर्सने देखील बनावट असणाऱ्या सोन्याला हिरवा झेंडा दाखवला होता. या प्रकरणामध्ये बँकेने तक्रार केल्यानंतर धंतोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
गोल्ड लोन ऑडीट झाल्यानंतर समोर आला प्रकार
आयसीआयसीआय बँकेमध्ये गोल्ड लोन ऑडिट करण्यात आलं. यानंतर बँकेच्या नऊ शाखांमध्ये 159 खातेदारांनी बनावट दागिने देऊन गोल्ड लोन घेतल्याची माहिती समोर आली. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये हा स्कॅम उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणामधील सर्व आरोपींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा केला आहे.
advertisement
या प्रकरणामध्ये आरोप केला जातोय की, 2023 पासून ऑक्टोबर 2025 दरम्यान 159 अकाउंटधारकांनी बँकेच्या व्हॅल्युअर आणि ऑडिटर्ससोबत मिळून कट रचला. बनावट दागिने खरे असल्याचे सांगत बँकेकडून 23,19,64,751 रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कलम 406, 409, 420, 468, 120 (ब) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
गोल्ड लोन घेण्याच्या प्रमाणात वाढ
TransUnion CIBIL च्या रिपोर्टनुसार, गेल्या दोन वर्षांमध्ये गोल्ड लोनच्या सरासरी रकमेत मोठी वाढ झालीये. डिसेंबर 2025 तिमाहीमध्ये सरासरी गोल्ड लोन जवळपास 1.9 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. ज्यावरुन या क्षेत्रातील तेजी लक्षात येते. सोन्याच्या किंमतीत सतत वाढ झाल्याने लोक आपल्याजवळी सोन्याचा वापर करत आहेत.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 2:37 PM IST
मराठी बातम्या/मनी/
नागपुरातील ICICI बँकेत गोल्ड लोन घोटाळा उघड! बनावट दागिने ठेवून 23 कोटींचं कर्ज घेतलं








