Gold Price: जळगावात 3 हजार रुपयांनी वाढलं सोनं, चांदीचे दर काय? १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ, सोने दीड लाखांवर तर चांदी अडीच लाखांवर, लग्नसराईत ग्राहकांचे बजेट कोलमडले, नाराजी वाढली
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव: जळगावची ओळख असलेल्या सुवर्णनगरीत सध्या आनंदाऐवजी चिंतेचं वातावरण आहे. लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असतानाच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली. मागच्या २४ तासांत सोन्याच्या भावात तब्बल साडेतीन हजार रुपयांची तर चांदीत ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे दागिने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे बजेट पूर्णपणे कोलमडलं आहे. आधीच महागाई आणि त्यात सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळे बजेट बिघडणार आहे.
सोने दीड लाखा पार, तर चांदी अडीच लाखांवर!
जळगावच्या बाजारपेठेत सध्या सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५४ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीनेही अडीच लाखांचा टप्पा ओलांडला असून, प्रति किलोचा दर २ लाख ५० हजार ३०० रुपयांपर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ मानली जात आहे.
advertisement
का वाढले अचानक दर?
सुवर्णतज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय राजकारणातील घडामोडींचा हा थेट परिणाम आहे. आखाती देशांतील युद्धाची तीव्रता कमी होण्याचे संकेत मिळताच जागतिक गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्याकडे धाव घेतली आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे मोठे गुंतवणूकदार सोन्याला सुरक्षित पर्याय मानत आहेत, ज्यामुळे मागणी वाढून दर कडाडले आहेत.
advertisement
सोनं वाढलं तरी खरेदीसाठी गर्दी
घरात लग्न कार्य असल्याने दागिने खरेदी करणे अनिवार्य आहे, मात्र वाढलेल्या दरामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. "दोन दिवसांपूर्वी जे सोनं परवडत होतं, ते आता आवाक्याबाहेर गेलंय," अशी भावना अनेक ग्राहक व्यक्त करत आहेत. जरी बाजारपेठेत खरेदीचा वेग काहीसा मंदावला असला, तरी लग्नसराईमुळे आवश्यक खरेदीसाठी सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी कायम आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 01, 2026 2:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price: जळगावात 3 हजार रुपयांनी वाढलं सोनं, चांदीचे दर काय? १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?









